Paytm Share Price Sakal
Share Market

Paytm Share: असं काय झालं की पेटीएमचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किटवर आले? काय आहे तेजीचे कारण?

राहुल शेळके

Paytm Share Price: आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती आणि शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, मात्र आता चित्र बदलले आहे. सततच्या घसरणीनंतर पेटीएमचे शेअर्स आता वरच्या सर्किटवर आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही पेटीएमचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये आहेत.

पेटीएम शेअर्स वाढण्याचे कारण काय आहे?

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम चर्चेत आहे. शेअर्स सुमारे 60 टक्क्यांनी घसरल्यानंतर अप्पर सर्किटवर आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रातही, शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 358.35 रुपयांवर पोहोचला, तर मंगळवारी बाजार उघडल्यानंतर, पेटीएमचे शेअर्स प्रति शेअर 376.45 रुपयांवर पोहोचले.

31 जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई केली आणि त्यांच्या बहुतांश सेवांवर बंदी घालण्यास सांगितले. यापूर्वी सेवांवर बंदी घालण्याची अंतिम मुदत 29 फेब्रुवारी ठेवण्यात आली होती, परंतु ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन RBI ने त्याची अंतिम मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे.

पेटीएमसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. कंपनीला आपली सेवा दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे, त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला.

पेटीएमचा शेअर किती पुढे जाऊ शकतो?

देशातील सर्वात मोठी ऑनलाइन पेमेंट कंपनी पेटीएमच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदार खूश आहेत. विदेशी ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने पेटीएमच्या शेअर्सची लक्ष्य किंमत 600 रुपये केली आहे.

ब्रोकरेज फर्मने असा युक्तिवाद केला आहे की आरबीआयच्या कारवाईचा पेटीएम पेमेंट बँक किंवा पेटीएमच्या इतर कामांवर परिणाम होणार नाही. पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन 15 मार्चनंतरही काम करत राहतील असा दावा कंपनीने केला आहे.

पेटीएमने दावा केला आहे की त्यांची UPI सेवा 15 मार्च नंतरही सुरू राहील. त्याच वेळी, पेटीएमने आपले नोडल खाते पेटीएम पेमेंट्स बँकेतून ॲक्सिस बँकेत हस्तांतरित केले आहे. यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, त्याचा परिणाम शेअर्सवर दिसून येत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT