Polycab India shares fall after Income Tax raids at 50 locations  Sakal
Share Market

Polycab Share: पॉलीकॅबचे शेअर्स 22 टक्क्यांनी घसरले; आयकर विभागाने कंपनीवर केले गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

Polycab India Share: आज शेअर बाजारात पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आयकर विभागाने 10 जानेवारी रोजी पॉलीकॅब इंडियाच्या कार्यालयाची झडती घेतल्याने पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे ​​शेअर्स गुरुवारी 22 टक्क्यांहून अधिक घसरले.

राहुल शेळके

Polycab India Share: आज शेअर बाजारात पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आयकर विभागाने 10 जानेवारी रोजी पॉलीकॅब इंडियाच्या कार्यालयाची झडती घेतल्याने पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे ​​शेअर्स गुरुवारी 22 टक्क्यांहून अधिक घसरले. पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि नाशिकसह कंपनीच्या 50 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

याशिवाय गुजरातच्या दमण आणि दिल्लीमधील कार्यालयातही छापे टाकण्यात आले. याआधी मंगळवारीही पॉलीकॅबचे शेअर 9 टक्क्यांनी घसरले होते. पॉलीकॅबचे शेअर्स गेल्या एका महिन्यात सुमारे 30 टक्क्यांनी घसरले आहेत. आज पॉलीकॅब इंडियाचा शेअर बीएसईवर 22.4 टक्क्यांनी घसरून 3,812.35 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला.

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, सापडलेल्या कागदपत्रांवरून कंपनीने मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचे उघड झाले आहे. वित्त मंत्रालयाने माहिती दिली आहे की, कंपनीने अंदाजे 1000 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख विक्री केली आहे, ज्याची कुठेही नोंद नाही. याशिवाय कंपनीने कच्च्या मालाच्या खरेदीबाबतही माहिती दिलेली नाही.

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत 4 कोटींहून अधिक रोकड जप्त केली असून 25 हून अधिक बँक लॉकर्स जप्त केले आहेत. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडने अलीकडेच स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीच्या कर चुकवेगिरीच्या वृत्तांचे खंडन केले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT