Pratham EPC Projects IPO : प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्सचा (Pratham EPC Projects) आयपीओ 11 मार्चपासून खुला होणार आहे. 36 कोटीचा हा आयपीओ 13 मार्चला बंद होणार असून यासाठी प्राइस बँड 71-75 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.
इश्यूमध्ये 48 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. प्रथम इपीसी प्रोजेक्ट्स लिमिटेडची सुरुवात 2014 साली झाली. कंपनी भारतातील तेल आणि वायू युटिलिटीजना एंड टू एंड सर्व्हिस पुरवते. प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्स लिमिटेड इंटिग्रेटेड इंजीनिअरिंग, प्रोक्योअरमेंट, कंस्ट्रक्शन आणि कमिशनिंगमध्ये माहिर आहे. कंपनी वेल्डिंग, टेस्टिंग आणि कमिशनिंगसह गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट हाती घेते.
आयपीओ बंद झाल्यानंतर, कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग एनएसई एसएमइवर 18 मार्चला होऊ शकते. या आयपीओमध्ये, गुंतवणूकदार 1600 शेअर्सच्या साईजमध्ये बोली लावू शकतात. इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहेत. मार्केट मेकर स्प्रेड एक्स सिक्युरिटीज आहे.
प्रथम इपीसी प्रोजेक्टचे प्रमोटर नयनकुमार मनुभाई पानसुरिया आणि प्रतीककुमार मगनलाल वेकारिया आहेत. सध्या कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी 100 टक्के आहे, जी आयपीओनंतर 72.97 टक्के कमी होईल.
आयपीओमधील 50 टक्के शेअर्स टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 75 ते 88 रुपये अर्थात 117.33 टक्के प्रीमियमने ट्रेडिंग करत आहेत. ग्रे मार्केट हा एक अनधिकृत बाजार आहे,
जिथे कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट होईपर्यंत व्यापार करतात. एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कंपनीचा महसूल सुमारे 36 कोटी आहे आणि निव्वळ नफा 5.23 कोटी होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, प्रथम इपीसी प्रोजेक्टचा महसूल वार्षिक आधारावर 2 टक्क्यांनी वाढून 51.67 कोटी झाला. या कालावधीत निव्वळ नफा वार्षिक आधारावर 73.14 टक्क्यांनी वाढून 7.64 कोटी झाला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.