Rahul Gandhi Portfolio Sakal
Share Market

Rahul Gandhi: शेअर मार्केट कोमात पण राहुल गांधी जोमात! 'या' कंपनीच्या शेअरमुळे केली छप्परफाड कमाई

राहुल शेळके

Rahul Gandhi Portfolio: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी शेअर बाजारात गुंतवणूक करतात. अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स आहेत. यापैकी एक Vertoz Advertisingचा शेअर आहे. जो बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. कंपनीचा शेअर अनेक वेळा अप्पर सर्किटला लागला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात या शेअरची माहिती दिली होती. त्यांच्याकडे कंपनीचे 260 शेअर्स होते, जे आता 5200 शेअर्समध्ये रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही अनेक पटींनी वाढले आहे.

स्टॉक स्प्लिट आणि बोनसमुळे 260 शेअर्सचे झाले 5200

दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नलच्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्याकडे Vertos Advertising चे 260 शेअर्स होते. कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्या शेअर्सचे 2600 शेअर्समध्ये रूपांतर झाले. यानंतर कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे 2600 शेअर्स दुप्पट होऊन 5200 शेअर्स झाले आहेत.

Vertos Advertising कंपनीची सुरुवात 2012 साली सुरू झाली, ही adtech कंपनी आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने ते डिजिटल मार्केटिंग, जाहिरात एजन्सी आणि डिजिटल मीडिया व्यवसायांना डेटा मार्केटिंग, जाहिरात सेवा पुरवतात.

कंपनीचे उत्पन्न आणि नफा सतत वाढत आहे

व्हर्टोझ ॲडव्हर्टायझिंगने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 45.66 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांचा ऑपरेटिंग नफा 6.65 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 4.69 कोटी रुपये होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 155 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल 83 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, कंपनीचा ऑपरेटिंग नफा 21 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 16 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: अख्खा ट्रक खड्ड्यात गेला, पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील घटना

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

SCROLL FOR NEXT