Patanjali Foods New Products: रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडने अनेक नवीन उत्पादने बाजारात लाँच केली आहेत. कंपनीने न्यूट्रास्युटिकल्स, हेल्थ बिस्किटे, न्यूट्रेला मिलेट आधारित उत्पादने आणि प्रीमियम ड्राय फ्रूट्सह नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत.
कंपनीने ग्राहकांसाठी एकूण 14 नवीन उत्पादने लाँच केली आहेत. खेळाडूंसाठी कंपनीने Nutrela Sports लाँच केले आहे. यात स्पोर्ट्स ड्रिंक्स, स्पोर्ट्स व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्स यांचा समावेश आहे.
याशिवाय कंपनीने Nutrela Max Millets आणि Nutrela MaxxNuts देखील लाँच केले आहेत. पतंजलीने विविध ग्राहक विभागांसाठी 14 विविध प्रीमियम फूड उत्पादने लाँच केली आहेत.
पतंजली करणार युनिलिव्हरशी स्पर्धा:
पतंजलीने दशकभरापूर्वी आपल्या व्यवसायातून 20 हजार कोटींची उलाढाल करणार असल्याचे सांगितले होते. व्यवसायामुळे पतंजली युनिलिव्हर या दिग्गज कंपनीलाही टक्कर देणार आहे.
आज पतंजली एकामागून एक उत्पादने बाजारात लाँच करत आहे. शुक्रवारी पतंजलीने फिटनेस ड्रिंक्स, फिटनेस व्हिटॅमिन्स आणि मिनरल सप्लिमेंट्ससह Nutrela Max Millets आणि Nutrela Maxx Nuts लाँच केले आहे.
क्रीडा आणि फिटनेस उत्पादनांची मागणी पाहून पतंजलीने अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. अंदाजानुसार, भारतीय क्रीडा पोषण उद्योग 2028 पर्यंत 18 टक्के सीएजीआरने वाढू शकतो.
2028 पर्यंत तो 8,000 कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी पतंजली फूड्सने न्यूट्रेला स्पोर्ट्स लाँच केले आहे.
पतंजलीने न्यूट्रेला स्पोर्ट्स अंतर्गत स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि स्पोर्ट्स व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्स लॉन्च केले आहेत.
या सर्वांशिवाय पतंजलीने बिस्किटांमध्ये रागी बिस्किटे, ग्रेन बिस्किटे आणि डायजेस्टिव्ह बिस्किटांसह अनेक उत्पादने लाँच केली आहेत.
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी योगगुरू रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. पतंजली फूड्सच्या शेअरची वाढ कंपनीने लॉन्च केलेल्या अनेक प्रीमियम उत्पादनांमुळे झाली आहे.
शुक्रवारी बीएसईवर ट्रेडिंग दरम्यान, शेअर 1.60% वाढून 1141 रुपयांच्या किंमतीवर पोहोचला. सप्टेंबर 2022 मध्ये शेअरने 1495 रुपयांची पातळी गाठली होती.
ही 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी आहे. तसेच 20 मार्च 2023 रोजी, शेअरने 851.70 रुपयांची पातळी गाठली आहे. हाशेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.