Real Estate Company sakal
Share Market

Real Estate Company : 2000 कोटीचा राइट्स इश्यू आणणार ही रिऍल्टी कंपनी ; एका वर्षात 295% परतावा

सकाळ वृत्तसेवा

रिअल इस्टेट कंपनी सोभा लिमिटेडने (Sobha Ltd) पुढील पाच वर्षांत आपले इक्विटी कॅपिटल चार पटीने वाढवून 10,000 कोटीपर्यंत नेण्याचे टारगेट ठेवले आहे. शिवाय चालू आर्थिक वर्षात सुमारे 2,000 कोटी उभारण्यासाठी राइट्स इश्यू सुरू करणार आहे. सोभा ग्रुप कंपनी सोभा लिमिटेडच्या संचालक मंडळाने राइट इश्यूद्वारे 2,000 कोटी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या शेअरने एका वर्षात सुमारे 295 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीची इक्विटी वाढवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ते राइट्स इश्यू आणणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष रवी मेनन यांनी नुकतेच दुबईत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यामुळे विकासासाठी वित्त उभारण्यास मदत होईल. कंपनीचे 52% स्टेक असलेले प्रमोटर राइट्स इश्यूमध्ये सहभागी होतील. यानंतर, कंपनीचा इक्विटी कॅपिटल बेस सध्याच्या 2,500 कोटीवरून 4,500 कोटीपर्यंत वाढेल.

दक्षिण भारतातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये सक्रिय असलेल्या कंपनीने आपल्या विस्तारासाठी दमदार योजना आखल्या आहेत आणि लवकरच मुंबईच्या लक्झरी निवासी मार्केटमध्येही प्रवेश करणार आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई परिसरात जमीन खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुबईच्या व्यवसाय पद्धती मुंबईतही वापरून पाहणार आहोत असे मेनन म्हणाले. या प्रक्रियेत खर्च वाढतो आणि उत्पादने महाग होतात पण मुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे जे यासाठी पैसे देऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रिअल इस्टेट कंपनी सोभा लिमिटेडचा स्टॉक नुकताच 2 टक्क्यांनी वाढला 1995.80 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,093.35 रुपये आहे आणि निचांक 505.25 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 18,929.34 कोटी आहे. या शेअरमध्ये एका आठवड्यात 9 टक्के, दोन आठवड्यात 22 टक्के आणि 6 महिन्यांत 124 टक्के वाढ झाली आहे. 2024 मध्ये स्टॉकचा परतावा 95 टक्के आहे. या शेअरने एका वर्षात 295 टक्के आणि 2 वर्षात 300 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 260 अंकांची वाढ, कोणते शेअर्स चमकले?

Latest Maharashtra News Updates : बॉम्बच्या धमकीनंतर एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले

'खालच्या दर्जाची वक्तव्ये करून मुश्रीफांनी शाहू महाराज, आंबेडकरांचा अपमान केलाय'; समरजित घाटगेंचा निशाणा

Vidhan sabha election 2024: उद्यापासून आचारसंहिता? आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक; महत्त्वाचे निर्णय होणार

Share Market Today: शेअर बाजार उघडताच कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? पहा यादी

SCROLL FOR NEXT