IPO Market  Sakal
Share Market

IPO Market : ‘आयपीओ’ प्रस्तावांचा विक्रम...सप्टेंबरमध्ये ‘सेबी’कडे ४१ कंपन्यांचे अर्ज; एका दिवसात १५ कंपन्यांची धाव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या शेअर बाजारात ‘आयपीओं’ची चलती आहे. मोठ्या संख्येने कंपन्या ‘आयपीओ’ बाजारात उतरत असून, सप्टेंबरमध्ये विक्रमी ४१ कंपन्यांचे प्रस्ताव (डीआरएचपी) भांडवल बाजार नियामक ‘सेबी’कडे दाखल झाले आहेत. एका महिन्यातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रस्ताव आहेत, तर ३० सप्टेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल १५ कंपन्यांनी ‘आयपीओ’साठी कागदपत्रे दाखल केली.

कंपन्यांच्या ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीच्या लेखापरीक्षेत आर्थिक विवरणांसह ‘सेबी’कडे ‘आयपीओ’साठी कागदपत्रे दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याने कंपन्यांनी ‘सेबी’कडे धाव घेतली. गुंतवणूकदारांची मजबूत मागणी आणि शेअर बाजारातील तेजी यामुळे आयपीओ बाजारात कंपन्यांची गर्दी होत आहे.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारही शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याऐवजी ‘आयपीओ’मध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्येही आयपीओची मोठी रेलचेल दिसू शकते, असे मत शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘सेबी’कडे ३० सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या १५ कंपन्यांमध्ये संभव स्टील ट्यूब्स, जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वाइने कॉर्पोरेशन, स्कोडा ट्यूब्स, देव एक्सीलरेटर, ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स, अजाक्स इंजिनिअरिंग, राही इन्फ्राटेक, व्हीएमएस टीएमटी, प्रोस्टार्म इन्फो सिस्टीम्स, ऑल टाइम प्लॅस्टिक, विक्रन इंजिनिअरिंग, वरिंदर कन्स्ट्रक्शन्स आणि आदित्य इन्फोटेक यांचा समावेश आहे.

प्राईमडाटाबेस डॉट कॉमच्या माहितीनुसार, वर्ष २०२३ मध्ये ११२, वर्ष २०२२ मध्ये ८९ आणि २०२१ मध्ये १२६ कंपन्यांच्या तुलनेत २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत एकूण १२० कंपन्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत ६२ कंपन्यांनी ‘आयपीओ’द्वारे ६४,४८५ कोटी रुपये उभे केले आहेत. वर्ष २०२३ मध्ये ५७ कंपन्यांनी ४९,४३६ कोटी रुपये उभे केले आहेत.

मासिक विक्रमांची आकडेवारी

महिना कंपन्या

सप्टेंबर २०१० ३४

ऑगस्ट २०२१ २७

सप्टेंबर २००७ २६

मार्च २०१० २२

सप्टेंबर २०२१ २२

भारतीय गुंतवणूकदार कंपन्यांच्या वाढीबद्दल आशावादी आहेत. मजबूत व्यवसायवाढीची शक्यता, शेअर बाजाराचा तेजीचा कल, कायमस्वरूपी देशांतर्गत तरलता आणि परदेशी निधीचा वाढलेला ओघ अनेक कंपन्यांना त्यांच्या ‘आयपीओ’ योजनेबाबत विचार करण्यास प्रवृत्त करत आहेत.

- रवी सरदाना, गुंतवणूक बँकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Classical Language: मराठी भाषेला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Chakan MIDC: चाकणमधील 50 कंपन्या खरंच स्थलांतरित झाल्यात का? औद्योगिक विकास महामंडळाने केला खुलासा

Pune Crime : वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून पित्याला अटक

Narendra Modi ५ ऑक्टोबरला ठाणे दौऱ्यावर, वाहतुकीत मोठे बदल, महत्त्वाचे रस्ते बंद, 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SSC Exam : दहावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT