Mukesh Ambani Reliance AGM 2023 Sakal
Share Market

Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? आज मुकेश अंबानी करू शकतात 5 मोठ्या घोषणा

Reliance AGM 2023: रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliacne AGM) आज होणार आहे.

राहुल शेळके

Reliance AGM 2023: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliacne AGM) आज होणार आहे. यामध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी अनेक मोठ्या घोषणा करू शकतात.

अंबानी अलीकडे लिस्ट केलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा रोडमॅप सादर करू शकतात, तसेच या वर्षाच्या अखेरीस देशात 5G आणण्याच्या योजनेची माहिती देऊ शकतात.

एजीएमवर लाखो गुंतवणूकदारांचे लक्ष

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एजीएमचे लक्ष गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारलेल्या नवीन क्षेत्रांवर आहे. अशा परिस्थितीत, यावेळीही रिलायन्सचे अध्यक्ष एजीएममध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि कतार गुंतवणूक प्राधिकरणाद्वारे रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) मधील स्टेक खरेदीबाबत माहिती देतील अशी अपेक्षा आहे.

रिलायन्सच्या एजीएमची तारीख खूप आधी जाहीर झाली होती, त्यामुळे दरवेळेप्रमाणे या वेळीही शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या एजीएममध्ये मुकेश अंबानी आपल्या मुलांना अधिक जबाबदाऱ्या देऊ शकतात अशी शक्यता आहे.

Jio Financial चा रोडमॅप

मुकेश अंबानी नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या रोडमॅप संदर्भात एक महत्त्वाची घोषणा करू शकतात, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स लिस्टिंग दिवसापासून सातत्याने घसरत आहेत. भागधारकांना या कंपनीतील बाह्य गुंतवणुकीसह इतर अपडेट मिळू शकतात.

जिओ-रिलायन्स रिटेलचा IPO

गुंतवणूकदार रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स रिटेलच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील एजीएम दरम्यान, मुकेश अंबानी यांनी सूचित केले होते की ते पुढील एजीएममध्ये जिओ आणि रिटेल IPO वर अपडेट देतील.

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगल, जनरल अटलांटिक, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि मेटा प्लॅटफॉर्मची गुंतवणूक आहे, तर रिलायन्स रिटेल व्हेंचर्सकडे कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, केकेआर, सिल्व्हर लेक पार्टनर्स, सौदी अरेबिया आणि सॉवरेन वेल्थ फंडांनी गुंतवणूक केली आहे.

देशात 5G सेवा सुरू

रिलायन्सने डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात 5G आणण्याचा प्लॅन करत आहे. आकर्षक 5G प्रीपेड प्लॅन्सच्या तपशीलांसह मोठी घोषणा एजीएममध्ये अपेक्षित आहे.

यासोबतच Jio 4G फोनसारखा 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याचा विचार करत आहे की नाही हे जाणून घेण्याचीही बाजारपेठ प्रतीक्षा करत आहे. मागील AGM मध्ये, कंपनीने JioAirFiber आणण्याची घोषणा केली होती.

नव्या ऊर्जेवर रिलायन्सचे लक्ष

रिलायन्सने 2035 पर्यंत कार्बन शून्य होण्यासाठी पुढील तीन वर्षांत नवीन ऊर्जा व्यवसायात 10 अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे, एजीएममध्ये संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीबद्दल काही अपडेट्स मुकेश अंबानी देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या वाटेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT