Reliance Capital shares to be delisted from exchanges Sakal
Share Market

Anil Ambani: अनिल अंबानींची मोठी कंपनी स्टॉक मार्केटमधून बाहेर; का आली ही वेळ?

Reliance Capital Delist: अनिल अंबानी यांची कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या नवीन मालकाचे नाव समोर आले आहे. हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडने (IIHL) 40,000 कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली कंपनी विकत घेणार आहे.

राहुल शेळके

Reliance Capital Delisting: अनिल अंबानी यांची कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या नवीन मालकाचे नाव समोर आले आहे. हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडने (IIHL) 40,000 कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली कंपनी विकत घेणार आहे.

या कर्जबाजारी कंपनीला खरेदी करण्यासाठी हिंदुजा ग्रुप कंपनीने 9,650 कोटी रुपयांची बोली लावली होती. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने रिलायन्स कॅपिटलसाठी 9,650 कोटी रुपयांच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जच्या योजनेला मंजुरी दिली आहे. (Reliance Capital shares to be delisted from exchanges)

एनसीएलटीने जूनमध्ये निर्णय दिला होता

NCLT च्या मुंबई खंडपीठाने IIHLच्या योजनेला जून 2023 मध्ये रिलायन्स कॅपिटलसाठी बोलीच्या दुसऱ्या फेरीत मंजुरी दिली होती. हिंदुजा ग्रुप कंपनीची गेल्या वर्षी जूनमध्ये 9661 कोटी रुपयांच्या आगाऊ रोख बोलीसाठी देखरेख समितीच्या माध्यमातून निवड करण्यात आली होती.

रिलायन्सचे विभाजन झाल्यानंतर रिलायन्सचे भांडवल अनिल अंबानींना देण्यात आले. धीरूभाई अंबानी यांचा मोठा मुलगा मुकेश अंबानी यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला, तर धाकटा भाऊ अनिल अंबानी हा व्यवसाय सांभाळू शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जी कंपनी विकली जाणार आहे त्या रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे 20 वित्तीय सेवा कंपन्या आहेत. ज्यात सिक्युरिटीज ब्रोकिंग, विमा आणि एआरसी यांचा समावेश आहे. अनिल अंबानींची ही कंपनी 40 हजार कोटींहून अधिक कर्जात बुडाली आहे. प्रचंड कर्जबाजारी असलेल्या या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य शून्य झाले आहे. याच कारणामुळे रिलायन्स कॅपिटलला शेअर बाजारातून डीलिस्ट करण्यात आले आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) खराब प्रशासन आणि पेमेंट डिफॉल्टनंतर कंपनीचे बोर्ड बरखास्त केले होते. यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीच्या लिलावासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. आता 108 वर्षे जुन्या हिंदुजा ग्रुपने ही कंपनी विकत घेतली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT