Multibagger Stock: सोलार पॅनल बनवणाऱ्या वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीजच्या (Waaree Renewable Technologies) शेअर्सने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत, त्याच्या शेअर्सची किंमत 14,000% पेक्षा जास्तीने वाढली आहे.
सध्या कंपनीचे शेअर्स 1,147.95 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅपिटल 2.36 हजार कोटी रुपये आहे. मागच्या 3 वर्षांपूर्वीचा विचार केल्यास या शेअर्समची किंमत बीएसईवर फक्त 8.22 रुपये होती.
म्हणजेच, गेल्या 3 वर्षात या शेअरची किंमत सुमारे 13,965 टक्क्यांनी वाढली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 1.4 कोटी रुपये झाले असते.
गेल्या एका वर्षात वारी शेअर्समध्ये 12.37% वाढ झाली आहे. त्याचवेळी, या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याच्या शेअर्सच्या किंमतीत 127.93 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 272.41 टक्के परतावा दिला आहे.
मार्च तिमाहीत वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा जवळपास दुपटीने वाढून 15.6 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 8 कोटी होता. पण, मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल कमी झाला.
वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड याआधी संगम रिन्युएबल्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. ही वारी ग्रुपची उपकंपनी आहे आणि सोलर ईएफसी सेगमेंटमध्ये कार्यरत आहे. वारी ग्रुपने 600 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे 10,000 सौर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहेत.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.