Hindenburg Report, SEBI Response Sakal
Share Market

SEBI: हिंडेनबर्ग अहवालानंतर सेबीने गुंतवणूकदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना; शेअर बाजारात...

Hindenburg Report, SEBI Response: हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालात भारतीय बाजार नियामक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांवर सेबीने पलटवार केला.

राहुल शेळके

SEBI Response: हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालात भारतीय बाजार नियामक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांवर सेबीने पलटवार केला. सेबीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की अध्यक्षा माधबी बुच यांनी वेळोवेळी संबंधित खुलासे केले आहेत.

तसेच, गुंतवणूकदारांना शांतता राखण्याचा आणि विचारपूर्वक पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मार्केट रेग्युलेटरने सांगितले की ज्या शेअर्सवर हिंडेनबर्गचा अहवाल आहे त्या शेअर्समध्ये शॉर्ट पोझिशन असू शकतात. तसेच सेबीने अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केल्याचे सांगितले. मात्र, काही तपास अद्याप प्रलंबित आहेत.

24 पैकी 22 आरोपांची चौकशी पूर्ण झाली

सेबीच्या म्हणण्यानुसार, अदानीवरील 24 पैकी 22 आरोपांची चौकशी आधीच पूर्ण झाली आहे, आणखी एका आरोपाची चौकशी मार्च 2024 मध्ये पूर्ण झाली आहे. याशिवाय उर्वरित एका प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

गुंतवणूकदारांना आवाहन

10 ऑगस्ट 2024 रोजी हिंडेनबर्ग रिसर्चने जारी केलेल्या अहवालावर कठोर भूमिका घेत सेबीने अशा अहवालांवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी गुंतवणूकदारांना शांत राहण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावत सेबीने हे स्पष्ट केले आहे की अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्ग रिसर्चने यापूर्वी केलेल्या आरोपांची रीतसर चौकशी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 3 जानेवारी 2024 रोजीच्या आपल्या आदेशात म्हटले होते की, सेबीने अदानी समूहाविरुद्ध 24 पैकी 22 तपास पूर्ण केले आहेत.

12 हजार पानांच्या 300 कागदपत्रांची तपासणी

सेबीने म्हटले आहे की, अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांच्या तपासादरम्यान 100 हून अधिक समन्स, सुमारे 1100 पत्रे आणि ईमेल्सद्वारे माहिती मागवण्यात आली . एवढेच नाही तर देशी आणि विदेशी नियामक आणि बाह्य एजन्सींची मदत घेण्यात आली आहे. तसेच, अंदाजे 12000 पानांच्या 300 हून अधिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT