Sebi Clears Measures Facilitate Ease Doing Biz For Fpis Other Entities  Sakal
Share Market

SEBI: सेबीने नवा नियम केला लागू, परदेशी गुंतवणूकदारांनाही दिलासा; शेअर बाजारात काय बदल होणार?

Share Market New Rule: बाजार नियामक सेबी बोर्डाची शुक्रवारी बैठक झाली ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. FPI म्हणजेच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात आला आहे.

राहुल शेळके

Stock Market Update: बाजार नियामक सेबी बोर्डाची शुक्रवारी बैठक झाली ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. FPI म्हणजेच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात आला आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत, ज्यांची भारतीय गुंतवणूक कोणत्याही एका कॉर्पोरेटमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशा FPIs साठी अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

विशेषत: कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अफवांना तोंड देण्यासाठी काही विशेष नियम बनवले जात असल्याचे सेबीकडून सांगण्यात आले. सेबीने अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) चे नियम सुलभ करण्याचा निर्णयही घेतला आहे.

SEBI बोर्डाच्या बैठकीत परदेशी गुंतवणूकदारांसाठी (FPIs) दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता जर एखाद्या विदेशी गुंतवणूकदाराची एकाच कंपनीत किंवा समूहात 50% पेक्षा जास्त गुंतवणूक असेल आणि ती कंपनी शेअर बाजारात लिस्ट असेल आणि विशिष्ट प्रवर्तक नसेल तर अशा परिस्थितीत सेबी काही अतिरिक्त माहिती विचारण्याचा नियम काढून टाकत आहे. त्या गुंतवणूकदारांकडूना ही सूट काही अटींसह देण्यात आली आहे.

शेअर बाजार नियामक सेबी लवकरच शेअर बाजारात एक नवीन पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. या प्रणालीला T+0 असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच या अंतर्गत शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार एकाच दिवसात केला जाईल.

नवीन प्रणाली अंतर्गत, सुरुवातीला काही निवडक ब्रोकर्ससह 25 शेअर्सवर चाचणी होईल. सध्या शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार एका दिवसानंतर होतो. पायलट प्रोजेक्ट म्हणून नवीन प्रणाली सुरू केल्यानंतर, सेबी तीन आणि सहा महिन्यांनंतर त्याचे पुनरावलोकन करेल. सध्या भारतीय शेअर बाजारात T+1 प्रणाली लागू आहे.

T+0 सेटलमेंट म्हणजे काय?

T+0 सेटलमेंटचा सरळ अर्थ असा होतो की तुमचे शेअर्स खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार त्याच दिवशी पूर्ण होतात. म्हणजेच या प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब नाही. तुम्ही शेअर्स खरेदी कराल त्या दिवशी तुम्हाला पैसे दिले जातील आणि त्याच दिवशी शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात ट्रान्सफर केले जातील.

त्याचप्रमाणे, तुम्ही शेअर्सची विक्री कराल त्याच दिवशी तुम्हाला पेमेंट मिळेल. आता सेबी 28 मार्चपासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. सेबीचे अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी कालच याबाबत माहिती दिली आहे. तुम्ही सेटलमेंटसाठी T+0 किंवा T+1 पर्याय निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT