F&O Traders Sakal
Share Market

F&O Traders: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताय सावधान! गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे 1.81 लाख कोटी पाण्यात

राहुल शेळके

Future And Options Investors Loss: फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये व्यवहार करणाऱ्या 1.13 कोटी व्यापाऱ्यांना 1.81 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 2023-24 या आर्थिक वर्षात फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये व्यापाऱ्यांना 75,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार नियामक सेबीने इक्विटीच्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करताना व्यापाऱ्यांना झालेला नफा आणि तोटा यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

व्यापाऱ्यांचे सुमारे दोन लाख कोटींचे नुकसान

SEBIने आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2023-24 या तीन वर्षांच्या कालावधीत इक्विटीच्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये व्यापार करताना झालेल्या नफा आणि तोट्याचा अहवाल तयार केला आहे.

अहवालात, सेबीने म्हटले आहे की, या तीन आर्थिक वर्षांमध्ये व्यापाऱ्यांनी फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील व्यापारामुळे 1.81 लाख कोटी रुपयांचे कष्टाचे पैसे गमावले आहेत. व्यापारात झालेल्या नुकसानीमध्ये व्यवहार खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.

प्रति व्यापारी 1.20 लाख रुपयांचे सरासरी नुकसान

2023-24 या आर्थिक वर्षात व्यापाऱ्यांचे 75,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या 73 लाख व्यापाऱ्यांपैकी प्रत्येक व्यापाऱ्याला 2023-24 मध्ये सरासरी 1.20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये व्यवहार खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.

4 लाख व्यापाऱ्यांचे सरासरी 28 लाखांचे नुकसान

सेबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पैसे गमावलेल्या व्यापाऱ्यांमध्ये 3.5 टक्के म्हणजे 4 लाख व्यापारी आहेत ज्यांचा प्रति व्यक्ती सरासरी तोटा 28 लाख रुपये आहे ज्यामध्ये व्यवहार खर्चाचाही समावेश आहे.

केवळ 1 टक्के व्यापाऱ्यांनी 1 लाख रुपये कमावले

सेबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन आर्थिक वर्षांत फक्त 1 टक्के व्यापारी असे आहेत ज्यांनी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

याशिवाय, व्यापाऱ्यांची संख्या दोन वर्षांत जवळजवळ दुप्पट होऊन 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 96 लाख झाली, जी 2021-22 मध्ये सुमारे 51 लाख होती. अशा व्यापाऱ्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण व्यवसायात सुमारे 30 टक्के योगदान दिले.

SEBIने सांगितले की, चांगल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची उपलब्धता आणि कमी व्यवहार खर्चामुळे व्यापाऱ्यांना फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये व्यापार करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे बाजारात तरलता वाढली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Price Hike : तेलाच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ; नवरात्रोत्सव, दिवाळीतही तेजीचा अंदाज

Stock Market vs Gold: सोने की शेअर बाजार, कोण करणार मालामाल? काय सांगतात तज्ज्ञ

Pune Rain: परतीच्या पावसानं पुण्यात दाणादाण! वाघोलीत धुंवाधार, पेठांमध्ये वाहनचालकांची कसरत

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात Asian Gamesचे गोल्ड जिंकले, पण ते भारताला पुढे पुन्हा जिंकता नाही येणार, कारण...

Latest Maharashtra News Updates Live : मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT