मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली आहे. मात्र, असे असतानाही सेमीकंडक्टरशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. भारत सरकारनेही देशाला सेमीकंडक्टर हब बनवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच SPEL सेमीकंडक्टर, एएसएम टेक्नोलॉजी, सीजी पॉव आणि लिंडे इंडियासारख्या कंपन्यांचे शेअर्स गेल्या एका वर्षात 70% पेक्षा जास्त वाढले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने या वर्षाच्या सुरुवातीला 1.26 लाख कोटीच्या अंदाजे खर्चासह देशात 3 सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यापैकी दोन प्लांट गुजरातमध्ये तर एक प्लांट आसाममध्ये उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावांमध्ये गुजरातमधील धोलेरा इथे 91 हजार कोटीच्या अंदाजे खर्चात उभारण्यात येणारा पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट देखील समाविष्ट आहे. जे टाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सद्वारे स्थापित केले जात आहे.
तैवानची कंपनी पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनही (PSMC) धोलेरा इथे प्लांट उभारणार आहे. याशिवाय, अमेरिकन मेमरी चिप उत्पादन कंपनी मायक्रोनने 22,516 कोटी खर्चून देशात चिप असेंबली प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे. भारताला या वर्षी डिसेंबरपर्यंत पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप मिळण्याची आशा असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते. असे झाल्यास चीनवरचे अवलंबित्व कमी होईल, याचा फायदा उद्योगांना तर होईलच पण रोजगारही वाढेल.
ट्रेंडफोर्स च्या अहवालानुसार, तैवानकडे डिसेंबर 2023 पर्यंत ग्लोबल सेमीकंडक्टर उत्पादन क्षमतेच्या 46% इतका वाटा होता. त्यानंतर चीन (26 टक्के), दक्षिण कोरिया (12 टक्के), अमेरिका (6 टक्के) आणि जपान (2 टक्के) यांचा क्रमांक लागतो. आता भारतानेही या शर्यतीत उडी घेतली आहे आणि याचा फायदा विशेषतः त्या कंपन्यांना होईल ज्यांना सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत चीनवरील आपले अवलंबित्व कमी करायचे आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.