Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73,000 पार, निफ्टी 22,000च्या वर

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 15 January 2024: सोमवारी शेअर बाजाराने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 73000 तर निफ्टीने 22000 चा टप्पा ओलांडला आहे. बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी क्षेत्रात होत आहे. विप्रोमध्ये 10 टक्के अप्पर सर्किट लागले आहे. एचसीएल टेक आणि टेक महिंद्रामध्ये 4-4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सेन्सेक्स शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढत आहेत आणि केवळ 5 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्सपैकी विप्रो 11.46 टक्के आणि टेक महिंद्रा 6.26 टक्क्यांनी वर आहे. एचसीएल टेक 3.69 टक्के आणि इन्फोसिसचा शेअर 3.01 टक्के वाढला आहे. TCS 2.03 टक्क्यांनी आणि HDFC बँक 1.41 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

निफ्टी IT नवीन उच्चांकावर

आयटी शेअर्समध्ये विक्रमी उच्चांक पाहायला मिळत आहे आणि शेअर बाजारात आयटी शेअर्स सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. 1000 हून अधिक अंकांच्या उसळीनंतर आयटी निर्देशांक 37550 च्या वर आला होता. आज आयटी शेअर्स शेअर बाजारात टॉप गेनर्स आहेत.

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली. आज इन्फोसिस, ओएनजीसी, टेक महिंद्रा आणि एलटीआय माइंडट्रीचे शेअर्स वधारले.

आज गुंतवणूकदारांचे Jio Financial, Angel One, Kesoram Industries आणि PABL च्या शेअर्सवर लक्ष राहणार आहे कारण या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येणार आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बँक निफ्टी लवकरच 50,000 अंकांची पातळी गाठेल. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निफ्टी लवकरच 22400 अंकांची पातळी पाहू शकेल.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ब्रँड कॉन्सेप्ट, एलआयसी, फिनोलेक्स केबल, इन्फोसिस, जिओ फायनान्शिअल, पटेल इंजिनिअरिंग, युनि पार्ट्स इंडिया, ग्लोबस स्पिरिट, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा, बँक, स्टोव्ह क्राफ्ट, देवयानी इंटरनॅशनल आणि इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडचे ​​शेअर्स वाढले आहेत.

आयसीआयसीआय बँक, नेस्ले, एक्साइड इंडस्ट्रीज, कामधेनू लिमिटेड, एचडीएफसी लाईफ आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

अदानी समूहाच्या 10 पैकी 7 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते, तर अदानी विल्मर, एनडीटीव्ही आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स घसरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT