Share Market Nifty slips Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा प्रॉफिट बुकिंग; सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट बंद, कोणते शेअर्स वधारले?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 23 February 2024: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. प्रमुख बाजार निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 73,142 वर घसरला, तर निफ्टी 22,297 वरून 22,193 वर घसरला. पीएसयू बँका आणि आयटी क्षेत्राकडून बाजारावर दबाव होता.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारात निफ्टीने 22297 चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकाने वाढ नोंदवली तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकातही घसरण झाली. निफ्टी फार्मा किंचित वाढीसह बंद झाला.

शेअर बाजारात पुन्हा प्रॉफिट बुकिंग

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारात तेजी असणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाइफ, डॉक्टर रेड्डीज, टायटन, एचडीएफसी लाइफ, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एलटीआय माइंड ट्री या शेअर्सचा समावेश होता.

S&P BSE SENSEX

तर ज्या शेअर्समध्ये घसरण झाली त्या शेअर्समध्ये HCL Tech, Maruti Suzuki, Asian Paints, JSW स्टील, ONGC आणि SBI च्या शेअर्सचा समावेश होता. अदानी समूहाच्या 10 पैकी 8 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. अदानी विल्मर सुमारे 7.43 टक्क्यांनी वधारला तर अदानी पॉवर घसरणीसह बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये 62,000 कोटी रुपयांची वाढ

आजच्या व्यवहारात शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपन्यांचे मार्केट कॅप 392.81 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 392.19 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 62,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कल्याणी स्टीलचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर

कल्याणी स्टीलच्या शेअर्सनी शुक्रवारी 889 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. शेअर 8.47% वाढून इंट्राडे रु. 889 च्या उच्चांकावर पोहोचला होता. ओडिशा सरकारसोबत सामंजस्य करार केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ओडिशामध्ये उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला. कंपनी स्टील आणि ऑटो पार्ट्सच्या 0.7 एमटीपीए मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्ससाठी 6,626 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT