Share Market Closing  Sakal
Share Market

Share Market Closing: चौफेर खरेदीमुळे शेअर बाजार चमकला; सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Closing: शेअर बाजारात सलग तीन दिवस सुरू असलेली प्रॉफिट बुकिंग शुक्रवारी थांबली. प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 496 अंकांनी वाढून 71,683 वर पोहोचला. निफ्टीही 160 अंकांनी वाढून 21,622 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 19 January 2024: शेअर बाजारात सलग तीन दिवस सुरू असलेले प्रॉफिट बुकिंग शुक्रवारी थांबले. प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 450 अंकांनी वाढून 71,683 वर पोहोचला. निफ्टीही 160 अंकांनी वाढून 21,622 वर बंद झाला.

ऑटो, मेटल, एफएमसीजी आणि सरकारी बँकिंग क्षेत्रात बाजारात सर्वाधिक खरेदी झाली. तसेच आयटी क्षेत्रातही उत्साह दिसून आला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शुक्रवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये वाढ झाली. आज ओएनजीसी, भारती एअरटेल, एनटीपीसी आणि ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये तेजी होती, तर इंडसइंड बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि दिवीज लॅबच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये टेक्नो इंजिनीअरिंग, आयआरसीटीसी, हायटेक पाईप्स, रामा स्टील, विकास लाइफ केअर आणि वारी रिन्युएबल एनर्जी यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. एसबीआय कार्ड आणि पेटीएमचे शेअर्स घसरले.

शेअर बाजारात अदानी समूहाच्या 10 पैकी पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर अदानी पोर्ट्स, एनडीटीव्ही, अदानी विल्मार, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 लाख कोटी रुपयांची वाढ

शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज बाजार बंद होताना, बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 373.65 लाख रुपयांवर पोहोचले आहे.

जे मागील सत्रात 369.75 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

या आठवड्याचा बाजार कसा होता?

या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्के घसरण झाली. गेल्या 3 महिन्यांतील साप्ताहिक आधारावर ही सर्वात मोठी घसरण झाली. या आठवड्यात निफ्टी बँकेत गेल्या वर्षभरातील सर्वात मोठी घसरण झाली.

निफ्टी आणि बँक निफ्टीच्या घसरणीत एचडीएफसी बँकेचा मोठा वाटा होता. या आठवड्यात HDFC बँकेत 10 टक्क्यांची घसरण झाली. या आठवड्यात HDFC बँक, LTIMindtree, IndusInd Bank आणि Adani Enterprises चे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले. तर ओएनजीसी, टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स आणि भारती एअरटेलचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT