Mutual Funds Investment: आज शेअर बाजारात विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक दर मिनिटाला नवे रेकॉर्ड बनवत आहेत. बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्सने 65,693 वर व्यापार सुरू केला होता, जो आता 521 अंकांच्या उसळीसह 66,040 वर व्यवहार करत आहे. (sensex nifty all time high)
निफ्टीचीही तीच स्थिती आहे. निफ्टी सर्वकालीन उच्चांकासह उघडला. निफ्टीने 19,566 वर व्यवसाय सुरू केला, निफ्टीनेही अनेक नवीन विक्रम नोंदवले आणि सकाळी 10 वाजता बाजाराने 182 अंकांच्या उसळीसह 19,566 चा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. बाजाराशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे की, यापुढेही शेअर बाजारात तेजी दिसून येईल.
निफ्टी 50 निर्देशांक त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार घाबरणे स्वाभाविक आहे.
ऑक्टोबर 2021 पासून पाच वेळा, निफ्टी 50 निर्देशांक 18,000 चा टप्पा ओलांडल्यानंतर 10-15 टक्क्यांनी घसरला आहे. आणि आता बाजार 19,000 च्या पुढे आल्याने गुंतवणूकदार सावध होत आहेत.
नीरव करकेरा, म्युच्युअल फंड वितरण प्लॅटफॉर्म फिस्डॉमचे प्रमुख-संशोधक म्हणाले की, सरकारी भांडवली खर्चात सातत्याने होणारी वाढ आणि मजबूत ताळेबंद असलेल्या बँकांकडून कर्जाची वाढती मागणी हे सूचित करते की आपली अर्थव्यवस्था पूर्वीच्या उच्चांकाच्या जवळ आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत व्याजदर वाढले असूनही, आर्थिक वाढीमध्ये कोणतीही मोठी घसरण झालेली नाही. अशा परिस्थितीत, दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कोणतीही अडचण येण्याचे कारण नाही.
बाजारात आणखी तेजी येईल का?
बाजाराच्या भविष्यातील वाटचालीचा अंदाज बांधणे अवघड आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढ केल्यास त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सह इतर केंद्रीय बँकांनी दर वाढवल्यास त्याचा बाजारावर दबाव येऊ शकतो.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) अजूनही भारतीय बाजारपेठेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. FII मे 2023 मध्ये 27,856 कोटी रुपयांचे निव्वळ खरेदीदार आहेत.
FII सलग तीन महिने खरेदी करत असले तरी ते भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करत राहतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे. देशांतर्गत गुंतवणूक स्थिर राहिल्याने, FIIचा प्रवाह चालू राहिल्यास, लवकरच बाजारात आणखीन नवीन उच्चांक पाहता येऊ शकतात. पण जर FII ने भारतातून जास्त पैसे काढायचे ठरवले तर बाजारात अस्थिरता दिसू शकते.
याशिवाय कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किंमती काही काळ नरमल्या आहेत, पण नजीकच्या भविष्यात हे असेच राहणार का? हा अंदाज बांधता येऊ शकत नाही.
2024 च्या सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधीही बाजारात काहीशी अस्थिरता पाहायला मिळू शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर, बाजाराच्या हालचालींवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत.
बाजारावरील बातम्यांचा प्रभाव तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. तुम्ही गुंतवणूक करण्यावर नियंत्रण ठेवू शकता. शेअर बाजारातील बातम्यांचा गोंगाट आणि अल्पकालीन अस्थिरता याकडे दुर्लक्ष करणे चांगले. तुमच्या पोर्टफोलिओचे सध्या पुनरावलोकन करण्यासाठी ही चांगली वेळ असू शकते.
सुहास राजदरेकर म्हणाले की, बाजार सर्वकालीन उच्चांकावर असल्यामुळे तुमचे इक्विटी म्युच्युअल फंड विकू नका. तुमचे दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे आर्थिक उद्दिष्ट असेल तरच बाजारात गुंतवणूक करा.
स्मॉल आणि मिड-कॅप शेअर्सपेक्षा लार्ज-कॅप शेअर्समध्ये चांगला परतावा मिळू शकतो, गुंतवणूकदारांनी या वेळी लार्ज-कॅप किंवा फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये अधिक गुंतवणूक केली पाहिजे.
आर्थिक सल्लागार अरुण कुमार पुढील सहा महिन्यांत सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) द्वारे 30% गुंतवणूक करण्याचे सुचवतात. त्याच वेळी, विनायक कुलकर्णी वैविध्यतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पोर्टफोलिओपैकी किमान 5 ते 10 टक्के सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकता.
नोंद: तज्ञांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.