Sensex sinks 1,300 pts from day's high 6 lakh crore loss to investors Here's why  Sakal
Share Market

Stock Market Crash: शेअर बाजारात त्सुनामी! गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Crash: सकाळी तेजीसह उघडल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून जवळपास 1300 अंकांनी घसरला आहे. निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून 400 अंकांनी घसरला आहे.

राहुल शेळके

Stock Market Crash: सकाळी तेजीसह उघडल्यानंतर दुपारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून जवळपास 1300 अंकांनी घसरला आहे. निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून 400 अंकांनी घसरला आहे.

तर मिड कॅप निर्देशांकात सकाळच्या उच्चांकापासून 1500 अंकांनी घसरला आहे. सध्या सेन्सेक्स 715 अंकांच्या घसरणीसह 71000 च्या खाली 79,708 अंकांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 227 अंकांच्या घसरणीसह 21,343 अंकांवर व्यवहार करत आहे.

भारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आतापर्यंत सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 368.60 लाख कोटी रुपये झाले जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 374.38 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच BSE मार्केट कॅप 5.78 लाख कोटी रुपयांनी खाली आले आहे.

आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण झी एंटरटेनमेंटच्या शेअरमध्ये झाली आहे जो 27.40 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

ओबेरॉय रियल्टी 8.95 टक्के, आयआरसीटीसी 6.69 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक 6.61 टक्के, आयडीएफसी 6.50 टक्के, एमसीएक्स इंडिया 5.87 टक्के घसरत आहे. याशिवाय BHEL 4.82 टक्क्यांच्या घसरणीसह, IOC 4.73 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

बाजारात बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीचा निर्देशांक 918 अंकांच्या घसरणीसह 919 अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेच्या 12 शेअर्सपैकी 11 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. फक्त आयसीआयसीआय बँकेचा शेअर वाढत आहे. एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT