Gautam Adani Sakal
Share Market

Gautam Adani: गौतम अदानींना आणखी एक धक्का, हिंडनबर्ग रिपोर्ट मध्ये नाव आलेल्या ऑडिटर फर्मचा राजीनामा

हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाचे ऑडिट करणाऱ्या कंपन्यांवर प्रश्न उपस्थित केले होते.

राहुल शेळके

Adani Group: अदानी समूहाची गॅस कंपनी अदानी टोटल गॅस लिमिटेडने सांगितले की, अहमदाबादमधील चार्टर्ड अकाउंटन्सी फर्म, ज्याच्या नियुक्तीवर यूएस शॉर्ट सेलरने प्रश्न उपस्थित केले होते. आता या फर्मने अदानी टोटल गॅसचा राजीनामा दिला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या 24 जानेवारीच्या अहवालात अदानी समूहाविरुद्ध फसवणूक, स्टॉक मॅनिप्युलेशन आणि मनी लाँड्रिंगचे आरोप लावले आणि समूहाचे ऑडिट करणाऱ्या कंपन्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

हिंडनबर्गने कोणत्या फर्मचा उल्लेख केला होता?

हिंडेनबर्गने सांगितले की, समूहाची प्रमुख फर्म अदानी एंटरप्रायझेस आहे आणि शाह धंधरिया नावाची एक छोटी फर्म आहे, जी अदानी टोटल गॅसचे स्वतंत्र लेखा परीक्षक पाहते.

हिंडेनबर्गने अहवालात म्हटले होते की, शाह धंधारियाची सध्या कोणतीही वेबसाइट नाही. 4 भागीदार आणि 11 कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले. फर्म दरमहा 32,000 रुपये कार्यालय भाडे देते. त्याची मार्केट कॅप 640 दशलक्ष आहे. असे वृत्त The Telegraph ने दिले आहे.

कंपनीने फाइलिंगमध्ये काय म्हटले आहे?

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये, अदानी टोटलने सांगितले की, मेसर्स शाह धंधरिया अँड कंपनी एलएलपी या चार्टर्ड अकाउंटंटने कंपनीच्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा 2 मे 2023 पासून लागू होणार आहे.

पत्रात, लेखापरीक्षकाने म्हटले आहे की त्यांना 26 जुलै 2022 रोजी 5 वर्षांची दुसरी मुदत देण्यात आली होती आणि 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीचे ऑडिट पूर्ण केले आहे. पुढे ते म्हणाले की ऑडिट फर्म दुसऱ्या असाइनमेंटमध्ये व्यस्त आहे, म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे.

इतर कोणत्याही कारणासाठी राजीनामा दिला नाही:

लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर हा राजीनामा दिल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे. हा राजीनामा अन्य कोणत्याही कारणासाठी देण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT