Share Market Closing Bell eSakal
Share Market

Closing Bell : शेअर मार्केटसाठी आजचा दिवस ठरला 'मंगल'वार; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी तेजी

बँक निफ्टीमध्ये ५०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.

Sudesh

भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस अगदीच फायद्याचा ठरला. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचा विलय होण्याची बातमी आल्यानंतर बँकिंग शेअर्समध्ये खरेदी वाढली. तर, बँक निफ्टीमध्ये ५०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.

सेन्सेक्स-निफ्टीची काय स्थिती?

मंगळवारी शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स ४४६ अंकांनी वाढून ६३,४१६ अंकांवर पोहोचला होता. तर दुसरीकडे निफ्टी १२६ अंकांच्या वाढीसह १८,८१७ अंकांवर पोहोचला होता. आज सकाळपासूनच शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी दिसून आली.

सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २७ शेअर्स तेजीत होते. तर, निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३८ शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

सेक्टोरल अपडेट

आजच्या बाजारात बँकिंग आणि फायनॅन्शिअल सेक्टरमध्ये चांगली तेजी दिसून आली. बँकिंग शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे बँक निफ्टीने ४० हजारांचा आकडा ओलांडला. शेअर मार्केट बंद होताना बँक निफ्टी ४४,१२१ अंकांवर होता.

इतर सेक्टरबाबत बोलायचं झाल्यास; ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, कन्झ्यूमर ड्यूरेबल्स या सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. दुसरीकडे ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजी सेक्टरच्या शेअर्समध्ये पडझड दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT