Share Market Closing latest updates in marathi Nifty 50, Sensex continue record-setting spree, up for 7th consecutive session 6 december 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: सलग 7 व्या दिवशी शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांनी कमावले 2.5 लाख कोटी

Share Market Closing: आजच्या व्यवहारात शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 6 December 2023: बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वाढीसह बंद झाले आणि बँक निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली. सेन्सेक्स 350 अंकांच्या वाढीसह 69,600 च्या वर बंद झाला. याशिवाय निफ्टी 50 निर्देशांक 20,950 च्या खाली बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील शेअर्स, ऊर्जा शेअर्स आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. याशिवाय मीडिया, इन्फ्रा, कमोडिटी, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. तर हेल्थकेअर, फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन आणि बँकिंग निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये आज पुन्हा एकदा नेत्रदीपक वाढ दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 30 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

बुधवारी शेअर बाजाराच्या व्यवहारादरम्यान LIC च्या शेअर्समध्ये सुमारे 4.47 टक्क्यांनी वाढ झाली, तर ITC, IREDA, इंडियन ऑइल, पंजाब नॅशनल बँक, गेल इंडिया, चेंबाऊंड केमिकल यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. गल्फ ऑइल लुब्रिकंट्स, कजारिया सिरॅमिक्स, बंधन बँक आणि वोक्हार्ट लिमिटेडचे ​​शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये ओम इन्फ्रा, टाटा मोटर्स, जिओ फायनान्शिअल, पटेल इंजिनिअरिंग, स्टोव्ह क्राफ्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, देवयानी इंटरनॅशनल, गती लिमिटेड, युनि पार्ट्स इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर कामधेनू लिमिटेड आणि एक्साइड इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली. विप्रोच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी आणि आयटीसीच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांनी 2.52 लाख कोटी कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 6 डिसेंबर रोजी वाढून 348.98 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवारी 5 डिसेंबर रोजी 346.46 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT