Share Market Closing latest updates in marathi Nifty scales all-time high of 20,291.55, Sensex trades over 450 pts higher; financial stocks gain 1 December 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार नव्या शिखरावर; निफ्टी प्रथमच 20,291 वर पोहोचला, सेन्सेक्स 492 अंकांच्या वाढीसह बंद

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 1 December 2023: चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. निफ्टीने प्रथमच 20269 च्या पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्स 67500 च्या आसपास व्यवहार करत होता. फार्मा, सरकारी बँकिंग आणि FMCG आणि मीडिया क्षेत्र सर्वांगीण खरेदीमध्ये घाडीवर आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली, ज्यामुळे निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 837 अंकांच्या वाढीसह बंद झाला. बँकिंगमध्येही 332 अंकांची वाढ झाली. याशिवाय फार्मा, एनर्जी, मीडिया, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्सही तेजीसह बंद झाले.

केवळ वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी होती. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅप विक्रमी पातळीवर

शेअर बाजारातील प्रचंड वाढीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. आजच्या व्यापारातील मार्केट कॅप 337.53 लाख कोटी रुपये होते जे गेल्या सत्रात 335.58 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स वाढले?

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये आयटीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.28 टक्के वाढ झाली. तर एनटीपीसी, अॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सचे केवळ 13 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक 1.58% च्या घसरणीसह बंद झाले. तर विप्रो, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Health: उपोषणस्थळी भोवळ अन् रक्तदाबाचा त्रास, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

SCROLL FOR NEXT