Share Market Closing latest updates in marathi Nifty trades near 20,950, Sensex up over 150 pts amid buying in financial, IT stocks 8 december 2023  Sakal
Share Market

Share Market: आठवडाभर बाजारात तेजीचे वादळ; निफ्टीने पहिल्यांदाच गाठला 21000चा टप्पा, सेन्सेक्सनेही केला विक्रम

Share Market Closing: अदानी पोर्ट्समध्ये 3% पेक्षा जास्त घसरण झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 8 December 2023: शेअर बाजारात शुक्रवारीही नवे विक्रम झाले. आज निफ्टी 21006, निफ्टी बँक 47303 आणि सेन्सेक्सनेही आज 69,893 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. शेवटी निफ्टी 68 अंकांनी वाढून 20,969 वर आणि सेन्सेक्स 303 अंकांनी वाढून 69,825 वर बंद झाला. आज आयटी, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रामुळे बाजारात तेजी होती.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. याशिवाय आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्येही वाढ झाली. तर ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, तेल आणि वायू, ऊर्जा, धातू, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सच्या वाढीला ब्रेक लागला आहे. दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 24 शेअर्स वाढीसह आणि 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.92 टक्के वाढ झाली. तर जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्समधील 11 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये आयटीसीचे शेअर्स 1.95 टक्क्यांनी घसरले. तर, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), बजाज फायनान्स, टाटा मोटर्स आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 84,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 8 डिसेंबर रोजी 349.36 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरूवार, 7 डिसेंबर रोजी 350.14 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 84,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 84,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT