Share Market Closing Latest Update 5 December 2023:
शेअर बाजारात मंगळवारी (5 डिसेंबर) सलग सहाव्या दिवशी वाढ झाली. प्रमुख बाजार निर्देशांक नवीन सर्वकालीन उच्चांकावर बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 431 अंकांनी उसळी घेत 69,296 वर बंद झाला आणि इंट्राडे 69,381 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला.
त्याचप्रमाणे निफ्टीही 168 अंकांनी वाढून प्रथमच 20,855 वर बंद झाला. व्यापारादरम्यान निर्देशांकाने 20,864 चा सार्वकालिक उच्चांक गाठला. बाजारपेठेत उत्साह निर्माण करण्याचे काम बँकिंग क्षेत्राने केले.
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
आजच्या व्यवहारात सर्वाधिक वाढ एनर्जी शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टी एनर्जी 981 अंकांनी किंवा 3.24 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय बँक निफ्टी 47000 पार करून ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाला आहे.
याशिवाय ऑटो, मेटल्स, ऑइल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टर्सचे शेअर्स तेजीसह बंद झाले. पण हेल्थकेअर, एफएमसीजी, आयटी, मीडिया आणि रिअल इस्टेट शेअर्स घसरणीसह बंद झाले.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स तेजीत होते. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 34 शेअर्स वाढीसह आणि 16 घसरणीसह बंद झाले.
अमेरिकेतील गुंतवणूक संस्था डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने गौतम अदानी समूहाला क्लीन चिट दिल्यानंतर, कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे आणि गौतम अदानी आता जगातील 16 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
मंगळवारी शेअर बाजाराच्या तेजीत मल्टीबॅगर शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवण्यात आली. शेअर बाजाराच्या तेजीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्सने 5.35 टक्क्यांची वाढी झाली. मंगळवारी पटेल इंजिनीअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, कामधेनू लिमिटेड, देवयानी इंटरनॅशनल, टाटा मोटर्स आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्सनी वाढ नोंदवली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटींची वाढ
शेअर बाजारातील तेजीनंतर आजच्या व्यवहारात बीएसईचे मार्केट कॅप 346.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 343.45 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.