Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: गुंतवणूकदार मालामाल! शेअर बाजारात सलग 9व्या दिवशी तेजी; निफ्टी प्रथमच 20,000 च्या वर झाला बंद

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 13 September 2023: बुधवारी सलग 9व्या दिवशी शेअर बाजारात तेजी होती. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 245 अंकांनी वाढून 67,466 वर बंद झाला. निफ्टीही 77 अंकांनी वाढून 20,070 वर बंद झाला. बाजारातील जोरदार वाढीमुळे सरकारी बँकिंग शेअर्स तेजीत होते.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, धातू, तेल आणि गॅस निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ दिसून आली आणि PSU बँक निर्देशांकात चार टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. तर कॅपिटल गुड्स, ऑटो आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी निर्देशांक तेजीसह बंद झाले.

बीएसई मिडकॅप निर्देशांकाची दिवसाच्या नीचांकीवरून चांगली रिकव्हरी झाली आणि सपाट पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, स्मॉलकॅप निर्देशांकात 0.8 टक्क्यांची वाढ दिसून आली.

गुंतवणूकदारांना 1.49 लाख कोटी रुपयांचा नफा

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 320.23 लाख कोटी रुपये झाले आहे तर गेल्या सत्रात मार्केट कॅप 318.74 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.49 लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.

Share Market Closing 13 September 2023 (S&P BSE SENSEX)

शेअर बाजारावर तज्ञांचे मत

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, कमकुवत जागतिक संकेत असूनही देशांतर्गत शेअर बाजार वाढीसह बंद झाले.

ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई वाढीचा दर 6.83 टक्क्यांवर घसरल्याने आणि औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीत झालेली वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची चांगली वाढ दर्शवते.

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत झालेली घसरण आणि तेलाच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंतवणूकदार अमेरिकेच्या महागाई दर डेटाची वाट पाहत आहेत, जे फार महत्वाचे आहे कारण ते फेड रिझर्व्हच्या पुढील धोरणांची दिशा ठरवेल.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.72% वाढ झाली आहे. टायटन, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे शेअर्स आज वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सचे उर्वरित 15 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे शेअर्स1.35 टक्क्यांनी घसरले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

पुणे सोलापूर महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनातील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

"ती गृहिणी म्हणजे तिला किंमत नाही हे चुकीचं" नवरात्रीनिमित्त स्नेहल तरडे यांचं डोळ्यात अंजन घालणारं वक्तव्य

धक्कादायक घटना! CM एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्ताला जाताना मोठा अपघात, १२ पोलीस जखमी

Fake SBI Branch: बनावट बँक शाखेचा भांडाफोड; SBIच्या नावे गावकऱ्यांची फसवणूक, लाखो रुपयांना गंडा

SCROLL FOR NEXT