Share Market Closing Latest Update 15 September 2023:
शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक तेजी होती. बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी नवीन विक्रम केला आहे. BSE सेन्सेक्स प्रथमच 67,700 च्या वर व्यवहार करत होता. NSE निफ्टी देखील 20,180 च्या वर व्यवहार करत होता.
ऑटो आणि पीएसयू बँकिंग शेअर बाजाराच्या वाढीमध्ये आघाडीवर होते. टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर बीपीसीएलचा शेअर सर्वाधिक घसरला.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
आजच्या व्यापारात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा आणि आरोग्य सेवा शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या वाढीमुळे निर्देशांकात वाढ दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 30 शेअर्समध्ये वाढ तर 30 शेअर्समध्ये घसरण झाली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.13 लाख कोटींची वाढ झाली
शेअर बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 323.30 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 322.17 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी
बीएसई सेन्सेक्सवर महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक 2.17 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेकमध्ये प्रत्येकी एक टक्का वाढ झाली.
याशिवाय टीसीएस, एचडीएफसी बँक, विप्रो, सन फार्मा, मारुती, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि एसबीआय यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:
सेन्सेक्सवर एशियन पेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, आयटीसी, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, टायटन आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
रुपया घसरला
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 15 पैशांनी घसरला आणि 83.18 वर बंद झाला. मागील सत्रात तो 83.03 च्या पातळीवर बंद झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.