Share Market update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद; सेन्सेक्समध्ये 100 अंकांची वाढ

Share Market Closing: बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 6 September 2023: बुधवारी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 65,880 वर बंद झाला. निफ्टीही 36 अंकांच्या वाढीसह 19,611 वर बंद झाला.

टाटा समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

टाटा कंझ्युमरचे शेअर्स निफ्टीमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर होते, तर टाटा स्टील सुमारे 2 टक्क्यांनी घसरून टॉप लूझर होता. याआधी भारतीय शेअर बाजार मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. काल बीएसई सेन्सेक्स 152 अंकांनी वाढून 65780 वर बंद झाला.

Share Market Closing 6 September 2023 (S&P BSE SENSEX)

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आज एफएमसीजी निर्देशांकात एक टक्का वाढ झाली आहे. त्याचवेळी फार्मा, ऑइल अँड गॅस आणि पॉवर निर्देशांक 0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. दुसरीकडे मेटल, रिअल इस्टेट आणि बँक निर्देशांक 0.4-1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक फ्लॅट नोटवर बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

BSE सेन्सेक्सवर भारती एअरटेलचा शेअर सर्वाधिक 1.57 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय टायटन, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसीचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय सन फार्मा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले इंडिया आणि रिलायन्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

टाटा स्टील, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, इन्फोसिस आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 72 हजार कोटींची वाढ झाली आहे

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 6 सप्टेंबर रोजी 317.36 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवारी, 5 सप्टेंबर रोजी 316.64 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 72 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 72 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT