Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today all broad market indices end in green 30 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी कमावले 2.35 लाख कोटी

Share Market Closing: आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक किंचित तेजीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 30 November 2023: आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक किंचित तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 86 अंकांनी वाढून 66,988 वर पोहोचला. निफ्टीनेही 36 अंकांची उसळी घेतली आणि 20,133 वर बंद झाला. बाजारात ऑटो, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रात खरेदी दिसून आली, तर बँकिंग क्षेत्रात घसरण दिसून आली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँकिंग, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये वाढ झाली. दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 घसरणपैकी 33 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स वाढले?

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.14 टक्के वाढ झाली आहे. तर सन फार्मा, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि विप्रोचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सचे केवळ 13 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक 1.19% घसरून बंद झाले. तर एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि टाटा मोटर्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी 2.35 लाख कोटी कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 30 नोव्हेंबर रोजी वाढून 335.64 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार, 29 नोव्हेंबर रोजी 333.29 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.35 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.35 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT