Share Market Closing Latest Update 9 October 2023: इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे शेअर बाजारात चौफेर विक्रीची नोंद झाली. बाजारातील सर्व प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 483 अंकांनी घसरून 65,512 वर बंद झाला. निफ्टीही 141 अंकांनी घसरून 19,512 वर आला. सरकारी बँकिंग, मेटल आणि वाहन क्षेत्रात सर्वाधिक विक्री नोंदवली गेली.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
आजच्या व्यवहारात बाजारातील सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सकाळपासून तेजीसह व्यवहार करणारा आयटी निर्देशांक खाली घसरला. आजच्या व्यवहारात बँकिंग, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, एनर्जी, ऑटो, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, मीडिया, मेटल क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही मोठी घसरण दिसून आली आहे.
निफ्टी मिड कॅप 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह 39,744 अंकांवर आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह 12,609 अंकांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 3 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 27 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 7 शेअर्स वाढीसह आणि 43 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ
आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 3 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.02 टक्के वाढ झाली. याशिवाय TCS आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे शेअर्स अनुक्रमे 0.36% आणि 0.32% च्या वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्समधील उर्वरित 27 आज शेअर्स घसरणीसह बंद झाले. यापैकी टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक 2.07 टक्क्यांनी घसरले. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
गुंतवणूकदारांचे 3.92 लाख कोटी रुपयांचे नुकसान
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 9 ऑक्टोबर रोजी 315.94 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी 319.86 लाख कोटी रुपये होते.
अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.92 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.92 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.