Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चौफेर खरेदी; सेन्सेक्समध्ये 634 अंकांची वाढ

Share Market Closing: निफ्टी 202 अंकांच्या वाढीसह 19,059 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 27 October 2023:

शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 634 अंकांनी वाढून 63,782 वर पोहोचला. निफ्टीही 202 अंकांच्या वाढीसह 19,059 वर बंद झाला.

सरकारी बँकिंग, वाहन, वित्तीय, मीडिया, आयटी आणि रिअल्टी क्षेत्र बाजारात खरेदीमध्ये आघाडीवर होते. आज मारुती सुझुकीच्या निकालाने बाजाराला चांगली साथ दिली. याशिवाय जगभरातील अनेक शेअर बाजारांमध्येही चांगले संकेत मिळाले ज्यामुळे देशांतर्गत बाजारात खरेदी वाढली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आज बाजारात सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. निफ्टी बँक 501 अंकांच्या किंवा 1.19 टक्क्यांच्या वाढीसह 42,782 अंकांवर बंद झाला.

एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टी आयटी 1.24 टक्क्यांनी, निफ्टी ऑटो 1.35 टक्क्यांनी, निफ्टी एफएमसीजी 0.89 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

Share Market Closing 27 October 2023 (S&P BSE SENSEX)

गुंतवणूकदारांना 4.55 लाख कोटी रुपयांचा नफा

शेअर बाजारात तेजी असताना आज गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पडला. मागच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे 26 ऑक्टोबर 2023 रोजी, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 306.04 लाख कोटी रुपये होते.

आज म्हणजेच 27 ऑक्टोबर 2023 रोजी ते वाढून 310.57 लाख कोटी रुपये झाले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 4.53 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

सेन्सेक्समधील फक्त तीन शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सवर 30 शेअर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी 27 शेअर्स आज तेजीसह बंद झाले. एचसीएल, अॅक्सिस बँक आणि एसबीआयमध्ये तेजी होती. आज फक्त एशियन पेंट, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसी घसरणीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Candidates : मुंबईतील इच्छुक मराठा उमेदवारांची यादी आली समोर; मनोज जरांगे शिक्कामोर्तब करणार का?

लग्नाला 20 वर्षं उलटूनही पंकज त्रिपाठींच्या आईने सुनेला स्वीकारलं नाही ; 'हे' आहे कारण

Sports Bulletin 25th October: भारताला वाचवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचे प्रयत्न ते आयपीएल लिलावापूर्वी मोठ्या घडामोडींचे संकेत

Diwali Recipe : दिवाळीची स्वच्छता करताना काही रहायला नकोय, तुम्ही घरातील या ठिकाणांची स्वच्छता केली का?

Latest Maharashtra News Updates Live : कुजलेले काजू, सुकामेव्याचा वापर करून मिठाई बनवणाऱ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT