Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Nestle, TCS drag; Tata Steel and JSW Steel shine 16 October 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: इस्राइल-हमास तणावामुळे बाजारात भूकंप, सेन्सेक्स 66,166 वर बंद, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Closing: फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव होता.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 16 October 2023: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. BSE सेन्सेक्स 115 अंकांनी घसरला आणि 66,166 वर बंद झाला. निर्देशांकाने इंट्राडे 66,039 च्या नीचांकी पातळी गाठली. निफ्टीही 19 अंकांनी घसरून 19,731 वर आला.

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी बंद झाले. एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव आला, तर ऑटो आणि मेटल क्षेत्रात खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, पीएसयू बँका, धातू, ऊर्जा, कमोडिटी, तेल आणि गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांच्या शेअर्समध्ये तेजी होती. तर बँकिंग, आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

परंतु आज पुन्हा व्यापारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी होती आणि दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 24 शेअर्स वाढीसह आणि 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing 16 October 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.68 टक्के वाढ झाली आहे. तर जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये घसरण

तर सेन्सेक्समधील उर्वरित 19 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी नेस्ले इंडियाचे शेअर्स सर्वाधिक 1.94 टक्क्यांनी घसरले. याशिवाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), एशियन पेंट्स, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 20 हजार कोटींची वाढ झाली आहे

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 16 ऑक्टोबर रोजी 322.20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी 322 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 20 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 20 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT