Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today pharma, realty, and metal indices were up 1 percent each 21 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात 2 दिवसांनी खरेदी; सेन्सेक्स 275 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: सलग 2 दिवसांच्या विक्रीनंतर मंगळवारी शेअर बाजारात खरेदीची नोंद झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 21 November 2023:

सलग 2 दिवसांच्या विक्रीनंतर मंगळवारी शेअर बाजारात खरेदीची नोंद झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 275 अंकांनी वाढून 65,930 वर बंद झाला. निफ्टीने 89 अंकांची उसळी घेत 19,783 वर पोहोचला. बाजारातील खरेदीला मेटल, रियल्टी आणि फार्मा क्षेत्राचा पाठिंबा मिळाला.

विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मंगळवारी शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेअर बाजारातील तेजीमध्ये एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्रायझेस आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सनी वाढ नोंदविली तर कोल इंडिया लिमिटेड, ओएनजीसी, बीपीसीएल आणि एलटीआय माइंड ट्री यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही JSW स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.76 टक्के वाढ झाली आहे. तर टाटा स्टील, टायटन, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

आज सेन्सेक्सवर फक्त 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्ये NTPC चा शेअर सर्वात जास्त 0.66% घसरणीसह बंद झाला. तर टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) चे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी 75,000 कोटी कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 21 नोव्हेंबर रोजी 328.10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार 20 नोव्हेंबर रोजी 327.35 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 75,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 75,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT