Share Market Closing Latest Update 10 October 2023 Sakal
Share Market

Share Market Closing: चौफेर खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी, 300 शेअर्स अपर सर्किटवर, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: मंगळवारी शेअर बाजारात खरेदी झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 10 October 2023: मंगळवारी शेअर बाजारात खरेदी झाली. त्यामुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 566 अंकांनी वाढून 66,079 वर बंद झाला. इंट्राडेमध्ये निर्देशांकाने 66,180 चा उच्चांक गाठला. त्याचप्रमाणे निफ्टीही 177 अंकांच्या वाढीसह 19,689 वर बंद झाला. मध्यपूर्वेतील युद्ध असूनही देशांतर्गत बाजार तेजीत आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे निफ्टी बँक आणि निफ्टी पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये नेत्रदीपक वाढ झाली आहे. याशिवाय आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

तर फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे दोन्ही शेअर्सच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 3 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 45 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 4 शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, JSW स्टील आणि महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे शेअर्सच्या वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समधील उर्वरित 3 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यापैकी इंडसइंड बँकेचे शेअर्स 0.54 टक्क्यांनी घसरले. याशिवाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि टायटनच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 0.22 टक्के आणि 0.02 टक्के घसरण झाली.

गुंतवणूकदारांनी 3.58 लाख कोटी रुपये कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 10 ऑक्टोबर रोजी 319.76 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी 316.18 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.58 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.58 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT