Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today weakness in financial, IT stocks; Coal India soars 5 per cent 13 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी गुंतवणूकदारांचे नुकसान

Share Market Closing: आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 10 November 2023:

आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. पहिल्याच दिवशी बाजारात विक्रीचे वर्चस्व राहिले आणि सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 350 अंकांनी किंवा 0.54 टक्क्यांनी घसरला. याशिवाय निफ्टी 50 निर्देशांकात घसरण झाली आणि हा निर्देशांक 82 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी मीडिया, इन्फ्रा, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर एनर्जीस मेटल्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक तेजीसह बंद झाला तर स्मॉल कॅप इंडेक्स तेजीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स वाढीसह आणि 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढले आणि 36 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

आज सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 7 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 0.94 टक्के वाढ झाली. तर JSW स्टील, NTPC, पॉवर ग्रिड आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सचे उर्वरित 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही बजाज फायनान्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. तर Infosys, Infosys, Tata Consultancy Services (TCS) आणि ICICI बँक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 40,000 कोटी रुपये बुडाले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 13 नोव्हेंबर रोजी 3,22,07 लाख कोटी रुपयांवर आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी 3,22,48 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 40,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 40,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT