Share Market update Sakal
Share Market

Share Market Closing: दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 210 अंकांनी घसरला, 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारच्या सत्रात नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing 12 July 2023: दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारच्या सत्रात नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. या घसरणीमुळे सेन्सेक्स उच्चांकावरून 400 अंकांनी तर निफ्टी उच्चांकावरून 125 अंकांनी घसरला.

आजच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स 210 अंकांच्या घसरणीसह 65,393 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह 19,382 अंकांवर बंद झा ला.

Share Market Closing 12 July 2023

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, मेटल्स, एनर्जी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्राचे शेअर्स घसरले आहेत. फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. बाजारात घसरण झाली असली तरी स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स तेजीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

टाटा मोटर्स, इन्फोसिस आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये आज सेन्सेक्समध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण झाली. त्याचप्रमाणे एनटीपीसी, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, मारुती आणि एचडीएफसी यांचे शेअर्स 0.50 टक्क्यांहून अधिक घसरले.

याशिवाय टाटा स्टील, भारती एअरटेल, टीसीएस, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँक घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, सन फार्मा, नेस्ले इंडिया, टायटन आणि एसबीआयचे शेअर्स सेन्सेक्समध्ये वाढीसह बंद झाले.

रुपया 12 पैशांनी मजबूत झाला

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी मजबूत होऊन 82.24 वर बंद झाला. मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 82.36 च्या पातळीवर होता.

गुंतवणूकदारांनी 31,000 कोटी रुपये कमावले

आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 12 जुलै रोजी 301.60 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवारी, 11 जुलै रोजी 301.29 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 31 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 31 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT