Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स- निफ्टीमध्ये मोठी घसरण, कोणत्या शेअर्स झाले नुकसान?

Share Market Closing: मेटल, फार्मा, रियल्टी, एफएमसीजीसह आरोग्य सेवा क्षेत्र बाजारातील विक्रीत आघाडीवर राहिले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 25 August 2023:

शेअर बाजारात शुक्रवारी घसरण झाली. BSE सेन्सेक्स 365 अंकांनी घसरून 64,886 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 120 वर 19,265 पर्यंत घसरला. मेटल, फार्मा, रियल्टी, एफएमसीजीसह आरोग्य सेवा क्षेत्र बाजारातील विक्रीत आघाडीवर राहिले.

एल अँड टीला सर्वाधिक फटका बसला

L&T निफ्टीमध्ये 2% च्या घसरणीसह टॉप लूसर होता, तर Jio Financial 3% च्या वाढीसह टॉप गेनर होता. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 180 अंकांनी घसरून 65,252 वर बंद झाला. बँकिंग एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाली, तर मिड कॅप शेअर्सतील सततच्या तेजीलाही ब्रेक लागला.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये विक्री झाली. बँक निफ्टी 265 अंकांच्या घसरणीसह 44,231 अंकांवर बंद झाला. एफएमसीजी शेअर्सचा निर्देशांक 529 अंकांनी घसरून बंद झाला.

याशिवाय ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, एनर्जी कन्झ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर ऑइल आणि गॅस सेक्टरचे शेअर्स घसरले. मिड कॅप निर्देशांक 0.82 टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप 0.41 टक्क्यांनी घसरला.

Share Market Closing Latest Update 25 August 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

व्होडाफोन आयडियाने शुक्रवारी टॉप गेनर्समध्ये स्थान मिळवले, शेअर 9.43 टक्क्यांनी वधारला. Ashi India Glass 9.42 टक्क्यांनी वधारला. त्याचप्रमाणे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स 8.91 टक्क्यांनी वधारले. फर्स्ट सोर्स सोल्युशन्सचे शेअर्स 7.44 टक्के आणि सेरी सॅनिटरीवेअर 5.75 टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

गल्फ ऑइल लुब्रिकंट्स 9.54 टक्के आणि DSJ Keep चे शेअर 5 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी, GMR 4.16 टक्के आणि BEML शेअर 3.94 टक्के घसरले. त्याचप्रमाणे लार्सन टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स घसरले.

गुंतवणूकदारांचे 2.12 लाख कोटी रुपयांचे नुकसान

आजच्या व्यवहारात, बाजारात नफा बुकिंगमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 306.55 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे मागील ट्रेडिंग सत्रात 308.67 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 2.12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT