Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, जिओ फायनान्शियलची काय स्थिती?

Share Market Closing: BSE सेन्सेक्स 110 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 28 August 2023: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, ऑटो आणि मिड कॅप शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली.

मात्र, रिलायन्सच्या एजीएमच्या दिवशी रिलायन्स आणि जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 110 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी, एफएमसीजी, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स घसरले.

आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी होती. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 29 शेअर्स वाढीसह आणि 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

लार्सन अँड टुब्रो (L&T) शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.09 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, सन फार्मा, मारुती, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट आणि एनटीपीसी यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

Share Market Closing Latest Update 28 August 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सवरील रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. याशिवाय नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, टायटन, आयटीसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स लाल घसरणीसह बंद झाले.

रुपया सपाट पातळीवर बंद

सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 82.62 वर बंद झाला. मागील सत्रात म्हणजेच शुक्रवारी तो 82.65 च्या पातळीवर बंद झाला होता.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, फेड रिझर्व्हच्या प्रमुखांनी धोरणात्मक उपाययोजनांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे चीनने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी उचललेल्या पावलांमुळेही बाजारातील उत्साह वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT