Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराचा पुन्हा एकदा ऐतिहासिक विक्रम; सेन्सेक्स प्रथमच 65,690 पार

शेअर बाजारात गुरुवारी नीचांकी पातळीवरून विक्रमी वाढ झाली.

राहुल शेळके

Share Market Closing 6 July 2023: शेअर बाजारात गुरुवारी नीचांकी पातळीवरून विक्रमी वाढ झाली. चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा विक्रम रचला. BSE सेन्सेक्स पहिल्यांदा 65,832 आणि निफ्टी 19,512 वर पोहोचला.

रियल्टी, पीएसयू बँकिंग शेअर्स बाजाराच्या तेजीत पुढे आहेत. अपोलो हॉस्पिटल्सचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढला आहे.

व्यवहारादरम्यान, बीएसई सेन्सेक्स प्रथमच 65,832 आणि निफ्टी 19,512 वर पोहोचला, जी निर्देशांकाची विक्रमी पातळी देखील आहे. सरतेशेवटी, निफ्टी 98 अंकांनी वाढून 19,497 वर आणि सेन्सेक्स 339 अंकांनी वाढून 65,785 वर बंद झाला.

ऑटो-रिअल्टी शेअर्समध्ये तेजी

बाजारातील तेजीत ऑटो आणि रिअल इस्टेट शेअर्स आघाडीवर होते. NSE वर रियल्टी निर्देशांक 2.25 टक्क्यांनी वाढून बंद झाला. M&M निफ्टीमध्ये 5% वाढीसह टॉप गेनर होता, तर आयशर मोटर 2.5% खाली बंद झाला.

Share Market Closing 6 July 2023

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती:

आजच्या व्यवहारात ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये विशेषत: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

त्यामुळे निफ्टी एनर्जी इंडेक्स 540 अंकांच्या उसळीसह 25,575 अंकांवर बंद झाला आहे. याशिवाय बँकिंग, ऑटो, फार्मा, मेटल्स, मीडिया, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 4.97 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे पॉवरग्रीड, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, विप्रो आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

मारुती, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि इन्फोसिसचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.

रुपया 27 पैशांनी घसरला

आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात कमजोरी दिसून आली. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 27 पैशांनी घसरून 82.49 वर आला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.70 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 301.70 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे.

तर बुधवारी ते 300.12 लाख कोटींवर बंद झाले. बुधवारी प्रथमच बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 300 लाख कोटी रुपये पार करण्यात यशस्वी झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT