Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: सेन्सेक्स 119 अंकांच्या तेजीसह बंद; ऑटो, रिअल इस्टेट, मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing 2 June 2023: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 118.57 अंकांच्या म्हणजेच 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 62,547.11 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 46.35 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 18,534.10 अंकांच्या पातळीवर बंद झाला. हिंदाल्कोचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक 3.43 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

टाटा स्टीलचा शेअर्स सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 1.93 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे मारुती सुझुकीचा शेअर 1.80 टक्क्यांनी वाढून बंद झाला. महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 1.71 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

त्याचप्रमाणे सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो आणि टायटन या कंपन्यांचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक तेजीसह बंद झाले. याशिवाय भारती एअरटेल, पॉवरग्रीड, आयटीसी, एसबीआय, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर्स तेजीसह बंद आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्समध्ये इन्फोसिसचा शेअरमध्ये सर्वाधिक 1.58 टक्क्यांची घसरण झाली. विप्रोचा शेअर 0.60 टक्क्यांनी, एचसीएल टेक 0.46 टक्क्यांनी, टीसीएस 0.46 टक्क्यांनी आणि इंडसइंड बँक 0.40 टक्क्यांनी घसरले.

याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एचडीएफसी, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

जर आपण क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोललो तर रिअल इस्टेट, ऑटो आणि मेटल क्षेत्रात 1-1 टक्क्यांची तेजी होती. त्याचबरोबर आयटी आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री दिसून आली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1 लाख कोटींची वाढ:

आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 1 जून रोजी वाढून रु. 285.12 लाख कोटी झाले आहे जे गुरूवार 1 जून रोजी 284.12 लाख कोटी होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT