Share Market Sakal
Share Market

Share Market Closing : दोन दिवसांच्या तेजीनंतर बाजारात पुन्हा घसरण; 'या' क्षेत्रांना मोठा फटका

गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात घसरण पाहायला मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing 23 March 2023 : दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात पुन्हा विक्रीचा जोर आला आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात घसरण पाहायला मिळाली.

तर यूएस फेड रिझर्व्हने व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवल्यानंतर आणि अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही भारतीय बाजार सकाळी तेजीने उघडले. मात्र युरोपीय बाजारातील घसरणीचा परिणाम दुपारनंतर भारतीय बाजारांवरही दिसून आला.

बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 290 अंकांनी घसरून 57,925 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 75 अंकांनी घसरून 17,077 अंकांवर बंद झाला. (Share Market Closing Latest Updates Today 23 March 2023 Bse Nse Sensex Nifty)

आजच्या व्यवहारात फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर बँकिंग, आयटी, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही लाल रंगात बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह तर 30 शेअर्स घसरून बंद झाले.

आजच्या व्यवहारात स्टेट बँक ऑफ इंडिया, एशियन पेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, कोटक महिंद्रा बँक आणि अदानी एंटरप्रायझेस हे निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले. तर हिंदाल्को इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, मारुती सुझुकी आणि जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स निफ्टीमध्ये वाढले.

Share Market Closing Latest Updates Today 23 March 2023 Bse Nse Sensex Nifty

शेअर बाजारात विक्रीची कारणे :

  • US FED ने व्याजदरात 25bps ने वाढ केली, पुढील दरवाढीचे संकेत

  • जागतिक बाजारात विक्रीमुळे युरोपच्या बाजारांची सुरुवात कमजोर झाली

  • SBI, INFOSYS, RIL, HCL TECH चे शेअर्स घसरले

  • व्यापक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव

'या' शेअर्समध्ये तेजी :

आजच्या व्यवहारात हिंदाल्कोचा शेअर्स 1.54 टक्के, मारुती सुझुकी 1.22 टक्के, नेस्ले 1.19 टक्के, भारती एअरटेल 0.91 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.84 टक्के, एसबीए 1.69 टक्के, बजाज ऑटो 1.5 टक्के वाढीसह बंद झाला.

'या' शेअर्समध्ये घसरण :

कोटक महिंद्रा 1.49 टक्के, एशियन पेंट्स 1.48 टक्क्यांनी, विप्रो 1.34 टक्क्यांनी, रिलायन्स 1.27 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांचे नुकसान :

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 2571.0 लाख कोटी रुपयांवर आले आहे, तर बुधवारी ते 257.99 लाख कोटी रुपये होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे 89,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT