Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण, बँकिंग शेअर्सचे काय झाले?

तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारच्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.

राहुल शेळके

Share Market Closing 15 June 2023: तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारच्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बँकिंग क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफा बुकिंग यामुळे भारतीय शेअर बाजार बंद झाला.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 310 अंकांनी घसरून 62,918 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 68 अंकांनी घसरून 18,688 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण बँकिंग शेअर्समध्ये दिसून आली. बँक निफ्टी 544 अंकांच्या किंवा 1.24 टक्क्यांच्या घसरणीसह 43,443 अंकांवर बंद झाला.

आयटी, धातू, रिअल इस्टेट, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सही घसरले. ऑटो, फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीने बंद झाले.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही तेजीने बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 वाढीसह तर 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह आणि 28 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट:

भारतीय शेअर बाजारातील रिकव्हरीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत थोडीशी घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 290.72 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे बुधवारी 290.85 लाख कोटी रुपये होते.

आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 13,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. सकाळच्या व्यापारात, बीएसई मार्केट कॅपने देखील 292 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT