share market investment SBI Cards & Payment Services share Price rs 839 sakal
Share Market

स्मार्ट गुंतवणूक : एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस शुक्रवारचा बंद भाव : रु. ८३९

भूषण गोडबोले

भारतीय स्टेट बँकेची उपकंपनी असलेली एसबीआय कार्ड्‌स आणि पेमेंट सर्व्हिसेस लि. ही भारतातील दुसरी सर्वांत मोठी क्रेडिट कार्ड वितरण कंपनी आहे. सुमारे १.७३ कोटी कार्डसह कंपनी व्यवसायात प्रगती करत आहे. १९९८ मध्ये कार्यरत झालेल्या या कंपनीला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

कंपनीकडे ग्राहकांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या कार्डचा पोर्टफोलिओ आहे, जो विविध ग्राहक विभागांना लक्ष्य करतो. स्टेट बँकेकडून या कंपनीला मजबूत आर्थिक तसेच व्यवस्थापकीय आणि ब्रँडिंग पाठबळ मिळते. क्रेडिट कार्ड वितरण हा बँकेच्या व्यवसायांमधील एक अविभाज्य भाग आहे. यामुळे स्टेट बँक या पालक कंपनीसाठीदेखील एसबीआय कार्ड्‌स अँड पेमेंट सर्व्हिसेस या कंपनीचा व्यवसाय धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय पेमेंट महत्त्वपूर्ण

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड वापरून यूपीआय पेमेंटला परवानगी दिली आहे. प्राथमिक चाचणी ‘रूपे’ क्रेडिट कार्डद्वारे केली जात आहे. आगामी काळात अधिक पेमेंट नेटवर्क या सिस्टीममध्ये आणले जाणे अपेक्षित आहे.

क्रेडिट कार्ड आकर्षक सवलती आणि ऑफरसह येतात. यामुळे ग्राहकवर्ग क्रेडिट कार्ड वापरण्यास प्राधान्य देऊ शकतात. यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करणे हा भारतातील क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी आगामी काळात व्यवसायवृद्धीचा महत्त्वाचा घटक ठरू शकतो.

जाहीर झालेल्या निकालानुसार, गेल्या तिमाहीत या कंपनीचा महसूल ३,९१२ कोटी रुपये झाला आहे. तसेच कंपनीचा निव्वळ नफा ५९३ कोटी रुपयांवर गेला आहे. सातत्याने २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत कंपनी कार्यक्षमतेने व्यवसायात प्रगती करत आहे.

वाढता ग्राहकवर्ग आणि विविध प्रकारच्या सुलभ ईएमआयच्या स्वरूपात परतफेडीचा पर्याय आदी अनेक ग्राहक-केंद्रित बाबींमुळे दीर्घावधीमध्ये भारतात या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी होऊ शकते. व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता दीर्घावधीसाठी या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स

Ambabai Mandir : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 34 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

हिंदू धर्मीयांचा हिंसक असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी, मगच..; काय म्हणाले महाडिक?

Navratri 2024 : वरीचा भात, खिडचीची चव वाढवेल उपवासाची दाण्याची आमटी, रेसिपी पण लगेचच होणारी

MSRTC : तुळजापूरसाठी राज्यभरातून १ हजार २६५ बस, महामंडळाचे नियोजन; लालपरी सज्ज

SCROLL FOR NEXT