Share Market Sakal
Share Market

Share Market : गुंतवणूकदार मालामाल! 34 हजारांच्या गुंतवणुकीत बनले कोट्यधीश; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

या शेअर्सने गुंतवणूकदारांना अगदी कमी काळात कोट्यधीश बनवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : सोलर ग्लास बनवणारी देशातील एकमेव कंपनी बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्समध्ये (Borosil Renewables) सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना अगदी कमी काळात कोट्यधीश बनवले आहे.

पण काही ब्रोकरेज फर्म्सने बोरोसिल रिन्युएबल्सचे टारगेट प्राईस कमी केले आहे. बोरोसिल रिन्युएबलचे मार्केट कॅप 6,293.81 कोटी आहे.

बोरोसिल रिन्युएबल्सचा डिसेंबर 2022 च्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक 51 टक्क्यांनी घसरून 22.5 कोटी रुपयांवर आला. कच्चा माल, तेल आणि वीज आणि कर्मचारी यांच्यावरील जास्त खर्चामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला. विक्रीचे प्रमाण 3 टक्क्यांनी वाढले.

कंपनीचा महसूल वार्षिक 4 टक्क्यांनी घसरून 160 कोटी रुपयांवर आला आहे. मात्र, कंपनीच्या एकूण विक्रीत निर्यातीचा वाटा 36 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. निर्यातीत मार्जिन जास्त आहे.

घरगुती ब्रोकरेज एचडीएफसी सिक्युरिटीजने सौर गॅसची घरगुती उपलब्धता, सौर मॉड्यूल्सच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ आणि SG-3 इथे उत्पादन सुरू केल्यामुळे सौरवर ऍड रेटिंग कायम ठेवले आहे. पण टारगेट किंमत 609 रुपयांवरून 529 रुपये करण्यात आली आहे.

बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सची किंमत 20 फेब्रुवारी 2009 रोजी फक्त 1.64 रुपये होती. आता ती सुमारे 294 पटीने वाढून 482.35 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे अवघ्या 14 वर्षात बोरोसिल ग्रुपच्या या कंपनीने केवळ 34,000 रुपयांच्या गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले.

गेल्या वर्षी, बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सची किंमत 15 फेब्रुवारी 2022 रोजी 438.10 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, पुढील दोन महिन्यांत, 25 एप्रिल 2022 रोजी ते 90 टक्क्यांनी वाढून 833 रुपयांवर पोहोचले.

हा एक वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. पण त्यानंतर शेअर्समधली तेजी थांबली आणि आतापर्यंत ती 42 टक्क्यांनी घसरली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT