Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्यासाठी 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी आयटी वगळता सर्वच सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. बेंचमार्क इंडेक्स अस्थिर व्यापारासह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 94.05 अंक अर्थात 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 67221.13 वर बंद झाला आणि निफ्टी 3.10 अंक म्हणजेच 0.02 टक्क्यांच्या कमजोरीसह 19993.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात वाढीने झाल्याचे शेअर खानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. मात्र, ती वरच्या स्तरांवर टिकून राहण्यात अपयशी ठरली आणि मग घसरण झाली. सलग सात ट्रेडिंग सत्रांच्या वाढीनंतर, मंगळवारी तो सुमारे 3 अंकांच्या किंचित घसरणीसह लाल रंगात बंद झाला.

मिड आणि स्मॉल कॅपमधील घसरण अधिक तीव्र होती. मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स सुमारे 4 टक्क्यांनी घसरले. गेल्या सात ट्रेडिंग सत्रांतील तीव्र वाढीनंतर आता निफ्टीमध्ये कंसोलिडेशन बघायला मिळेल.

डेली आणि आवर्ली टाइम फ्रेमवर मोमेंटम इंडिकेटर वेगवेगळे सिग्नल देत आहेत. त्यामुळे बाजारात किरकोळ घसरण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्राईस आणि मोमेंटम इंडिकेटर्स पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये कंसोलिडेशन होऊ शकत असल्याचे संकेत देत आहेत.

एकूणच बाजाराचा शॉर्ट टर्म आऊटलूक चांगला आहे. निफ्टीला 19865-19810 वर सपोर्ट दिसत आहे. तर पहिला रझिस्टंस 20200-20250 वर असू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • एनटीपीसी (NTPC)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द! नेमकं कारण काय?

PAK vs SL मॅचमध्ये वाद, आधी आऊट, मग नॉट आऊट... रुमालामुळे निर्णयच बदलला! काय घडलं?

Gold Prices: लवकरच सोने 85 हजारांवर पोहचणार! गुंतवणूकदार होणार मालामाल; किती मिळणार रिटर्न?

Amitabh Bachchan : जेव्हा अमिताभ दिवसाला 200 सिगारेट्स ओढायचे आणि होतं या गोष्टीचं जबरदस्त व्यसन ; "मी तेव्हा हाताला..."

Cabinet Meeting : आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे पडणार महागात! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT