Share Market Investment Tips: गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी प्रचंड अस्थिरते दरम्यान वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 164.99 अंकांनी अर्थात 0.25 टक्क्यांनी वाढून 65558.89 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 29.50 अंकांच्या म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 19413.80 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
निफ्टीने 19567 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला, मात्र विक्रीच्या दबावामुळे तो टिकू शकला नसल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. दिवसभर निफ्टी अतिशय अस्थिर राहिला.
डेली रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सने (RSI) मंदीच्या क्रॉसओव्हरचे संकेत दिले आहे. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी साईडवेज व्यवहार करताना दिसू शकतो. निफ्टीला 19300 वर सपोर्ट दिसत आहे. तर 19600 वर रझिस्टंस दिसत आहे.
बाजारात सध्या बेअर्सचे वर्चस्व असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह यांनी सांगितले. त्यामुळे बँक निफ्टी 45000 चा स्तर पार करू शकला नाही. दुसरीकडे, बुल्स 44700 ची सपोर्ट लेव्हल राखण्यात यशस्वी झाले, जे या पातळीवर खरेदीचे संकेत देत आहेत.
पण हा सपोर्ट तुटल्यावर खाली 44500-44000 ची पातळी दिसू शकते, जे बँक निफ्टीच्या 20-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी (20DMA) जवळ आहे. दुसरीकडे बँक निफ्टी 45000 च्या पातळीवर बंद झाल्यास यात पुन्हा तेजी दिसू शकते असेही ते म्हणाले.
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?
टीसीएस (TCS)
हिन्दाल्को (HINDALCO)
इन्फोसिस (INFY)
टेक महिन्द्रा (TECHM)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
एम फॅसिस (MPHASIS)
भारत फोर्ज (BHARATFORG)
ऍस्ट्रल (ASTRAL)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.