Share Market Sakal
Share Market

Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: मंगळवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी 19700 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 529.03 अंकांच्या अर्थात 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 66,589.93 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 147.00 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी वाढून 19711.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीमध्ये फॉलो-थ्रू खरेदीचा कल दिसून आल्याचे शेअरखानचे जतीन गेडियांनी सांगितले. निफ्टी 147 अंकांनी वाढून बंद झाला.

डेली चार्टवर, निफ्टी बाजूच्या कंसोलिडेशन रेंजमधून बाहेर पडला आणि आता एक ट्रेंडिंग मूव्ह दाखवत आहे. डेली मोमेंटम इंडिकेटरमध्ये पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर आहे, जो मजबूत खरेदीचे संकेत देत आहे.

डेली बोलिंजर बँडही आता विस्तारू लागले आहेत. हे निफ्टीच्या रेंजमधील विस्ताराचे संकेत देते. आता बाजार आणखी वधारणार असल्याचे संकेत देत आहेत.

वरच्या बाजूस, 19830-19900 जवळ निफ्टीला रझिस्टंस दिसत आहे तर 19570-19550 जवळ सपोर्ट दिसत आहे.

बँक निफ्टीसाठी मंगळवारचा दिवस खास होता. कारण आता तो डिसेंडिंग चऐनलमधून बाहेर पडला आहे जो त्याचा कंंसोलिडेशनचा टप्पा संपल्याचे दाखवत आहे.

पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये त्यात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. बँक निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 46500 च्या पातळीवर जाताना दिसू शकतो. तर खाली 44700 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • इन्फोसिस (INFY)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 5 : 'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : पीएम मित्र पार्क हे एक महत्त्वपूर्ण पाऊल - मोदी

SCROLL FOR NEXT