Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सूचवले 10 दमदार शेअर्स; देतील भरघोस परतावा

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: जुलैच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात स्मार्ट रिकव्हरीनंतर, मंगळवारी शेअर बाजार कंसोलिडेशनच्या मूडमध्ये दिसला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 68.36 अर्थात 0.10 टक्क्यांनी घसरून 66,459.31 अंकांवर बंद झाला.

निफ्टी 20.30 अंकांनी म्हणजेच 0.10 टक्क्यांनी घसरून 19,733.50 वर बंद झाला. मंगळवारी सकाळी काहीशा तेजीने व्यवसाय सुरू झाला. पण, त्यानंतर लगेच प्रॉफिट बुकींग सुरू झाली. यानंतर दिवसभर बाजारात चढ-उतार होत राहिले. नंतर शेवटी घसरणीसह बाजार बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजारात चढ उतार होत असल्याने गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. आरबीआयचे आर्थिक धोरण पुढील आठवड्यात येणार आहे. त्यामुळे त्याआधी सावधगिरीचा मूड आहे.

नुकत्याच झालेल्या तेजीमुळे बाजार पुढील संकेतांसाठी परदेशी बाजारांकडे फोकस करेल. त्यामुळे अनेक शेअर्सचे व्हॅल्युएशन खूप वाढले आहे. एकूणच तेजीचा कल आहे, पण अधूनमधून प्रॉफीट बुकींग दिसून येईल.

निफ्टीने डेली चार्टवर एक छोटी बियरीश कँडल तयार केली आहे, जी बुल्स आणि बियर्समध्ये अनिश्चितता असल्याचे संकेत देते आहे. 19,700 ची पातळी तुटल्यास निफ्टी 19,650-19,600 पर्यंत घसरू शकतो. तेजीच्या परिस्थितीत, 19,800 पार केल्यानंतर निफ्टी 19,840-19,875 च्या दिशेने जाईल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • ट्रेंट (TRENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • ए यू बँक (AUBANK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT