Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजारात दबाव दिसून आला. 18 ऑगस्टला सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 202.36 अंकांनी अर्थात 0.31 टक्क्यांनी घसरून 64948.66 वर बंद झाला आणि निफ्टी 55.10 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 19310.20 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
शुक्रवार हा बाजारासाठी अतिशय अस्थिर दिवस होता असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. निफ्टी रेंजच्या दोन्ही बाजूंनी वर-खाली होत लाल रंगात बंद झाला. शुक्रवारी बहुतांश सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.
आयटी, रियल्टी आणि फार्मावर सर्वात जास्त परिणाम झाला. अमेरिकन बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. पण आपल्या बाजारातील उतरती गती अजूनही मर्यादित आहे. पण या कमकुवतपणातही काही सेक्टर्समध्ये मजबूती दिसत आहे.
निफ्टीसाठी पहिला रझिस्टंस 20 इएमएवर दिसतो जो 19500 च्या आसपास आहे. तर, खाली 19100 वर सपोर्ट दिसत आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
टेक महिन्द्रा (TECHM)
टीसीएस (TCS)
हिन्दाल्को (HINDALCO)
इन्फोसिस (INFY)
ऍस्ट्रल (ASTRAL)
एम फॅसिस (MPHASIS)
व्होल्टास (VOLTAS)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPRO)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.