Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: बाजार सुरु झाल्यानंतर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय सांगतात तज्ञ

Share Market Tips: सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी वाढीसह बंद झाले.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी वाढीसह बंद झाले. मेटल, बँक, कॅपिटल गुड्स आणि रिऍल्टी शेअर्समधील वाढीच्या आधारावर निफ्टी 19450 च्या आसपास बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 213.27 अंकांच्या म्हणजेच 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 65433.30 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 47.50 अंकांनी अर्थात 0.24 टक्क्यांनी वाढून 19444 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीला गुरुवारी 19350 च्या आसपास सपोर्ट मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.मात्र, निफ्टीला आज 19500 चा रझिस्टंस पार करता आला नाही.

सध्या निफ्टीमध्ये पॉझिटीव्ह कंसोलिडेशन दिसून येत आहे. 19400 पातळी ही ट्रेंड डिसायडर लेव्हल असेल. जर निफ्टीने 19400 ची पातळी ओलांडली तर 19535 पर्यंत तेजी दिसून येईल. दुसरीकडे, निफ्टी 19400 च्या खाली 19350-19315 पर्यंत घसरेल असेही ते म्हणाले.

निफ्टी 19300 आणि 19500 च्या रेंजमध्ये व्यवहार करत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली टाईम फ्रेमवर, निफ्टी 19471 वर 21-डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (EMA) आणि 19281 वर 50-डे इएमए दरम्यान फिरत आहे.

जोपर्यंत निफ्टी दोन्ही बाजूने ही रेंज तोडत नाही, तोपर्यंत तो रेंजबाऊंड मुव्हमेंट दिसेल. जर निफ्टी 19500 च्या वर जाण्यात यशस्वी झाला तरच यात तेजी दिसेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • एल अँड टी (LT)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT